भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir Political Update) यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सध्या ते पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधीत्व संसदेच्या कनिष्ठ सभागृहात करत आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) तोंडवर आली त्यांनी असताना अचानक राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय जाहीर केल्याने एकाच वेळी क्रिकेट आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, त्यांनी आपला निर्णय भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांना कळवला आहे. ज्याबाबत त्यांनी आपल्या एक्स हँडलवरुन माहिती दिली आहे.
'राजकीय कर्तव्यातून मुक्त करा'
गौतम गंभीर यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद! (हेही वाचा, Payal Ghosh's Shocking Claims: 'अनुराग कश्यपने माझ्यावर बलात्कार केला, गौतम गंभीर नियमितपणे मिसकॉल द्यायचा'; अभिनेत्री पायल घोषचे धक्कादायक दावे)
पक्षप्रवेश होताच दिल्लीतून उमेदवारी
गौतम गंभीर हे क्रिकेटपटू आहेत. लोकसभा निवडणूक 2019 पूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपने त्यांना लगेचच लोकसभा निवडणूक 2019 मध्येच पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या मतदारसंघातून ते चांगल्या मताधिक्याने निवडूणही आले. त्यांनी तब्बल 6,95,109 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. (हेही वाचा, Gautam Gambhir On Ram Mandir Inauguration: राम मंदिर उद्घाटनावर गौतम गंभीरला एका चाहत्यांनी विचारला प्रश्न, क्रिकेटपटूने काय दिले उत्तर पाहा...)
समाधानकारक कामिगिरी नसल्याने नाराजी
दरम्यान, क्रिकेटपटून म्हणून त्यांनी मैदानावर जशी चांगली कामगिरी केली. तशी कामगिरी त्यांना राजकीय क्षेत्रात करता आली नसल्याचे त्यांचे टीकाकार मानतात. शिवाय, त्यांच्या मतदारसंघातील लोकांकडूनही त्यांच्यावर नाराजी होती. खास करुन कामे होत नाही, खासदार लोकांना भेटत नाही, अशा त्यांच्याबद्दल तक्रारी होत्या. या तक्रारी पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे कार्यक्रता आणि जनता अशी दुहेरी नाराजी गंभीर यांच्या बाबतीत होती. परिणामी गंभीर यांना लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पुन्हा उमेदवारी देण्याबाबत भाजप नेतृत्व फारसे अनुकूल नसल्याच्या चर्चा पाठिमागील काही दिवसांपासूनच सुरु होत्या. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीर यांनी स्वत:च राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
मीडिया रिपोर्टनुसार, भाजपा 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची प्रारंभिक यादी जाहीर करण्याच्या विचारात आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांसारख्या दिग्गजांसह 100 हून अधिक नावांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री 11 ते शुक्रवारी पहाटे 4 या कालावधीत पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत रात्रभर झालेल्या मॅरेथॉन बैठकीसह पक्षाने विस्तृत चर्चा केल्याचे समजते.