Lok Sabha Election Results 2019: गौतम गंभीर च्या लोकसभा निवडणूक 2019 मधील यशानंतर हरभजन सिंग याचं अभिनंदनपर ट्विट; गौतमनेही दिला खास रिप्लाय
Gautam Gambhir (Photo Credits: Twitter)

माजी क्रिकेटर गौतम गंभीरला(Gautam Gambhir) लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपाकडून तिकीट देण्यात आलं आहे. या निवडणूकीमध्ये गौतम गंभीर पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरला होता. गौतम गंभीरने कॉंग्रेसच्या अरविंदर सिंग (Arvinder Singh) आणि आपच्या अस्थी (Atishi) यांचा पराभव केला आहे. गौतम गंभीरच्या दणदणीत विजयानंतर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. Lok Sabha Election Results 2019: भाजप प्रणित नव्या NDA सरकारच्या शपथविधीसाठी 30 मेचा मुहूर्त

गौतम गंभीरला शुभेच्छा

भारतीय क्रिकेट संघामध्ये गौतम गंभीर आणि हरभजन सिंग हे खेळाडू एकत्र खेळले होते. आता क्रिकेटच्या पीच पलिकडेही त्यांनी मैत्री जपत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये गौतम गंभीरने हरभजन सिंगला शुभेच्छा देत त्याच्या यंदाच्या आयपीएल 12 मधील चैन्नई सुपर किंगच्या खेळाचं, हराभजन सिंगच्या परफॉर्मन्सचं कौतुक केलं आहे.

गौतम गंभीरने हरभजन सिंगचा उल्लेख चैन्नई सुपर किंगचा उत्तम खेळाडू असा केला आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये हरभजन सिंगने 11 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या होत्या. यंदाच्या सीझनमध्ये चैन्नई सुपर किंगचा सामना मुंबई इंडियंस सोबत झाला. मुंबई इंडियंस संघाने यंदा आयपीएल 12 च्या अंतिम सामन्यात विजय मिळवला.