Gang Rape In Hospital: तेलंगणातील रुग्णालयातील महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांकडून तपास सुरु
Representational Image (Photo Credits: Pixabay)

Gang Rape In Hospital:  तेलंगणा मधील निजामाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी रात्री उशिरा चार अज्ञात व्यक्तींनी एका महिलेवर कथित रुपात सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी हे सुद्धा सांगितले की, बलात्कार करण्यापूर्वी महिलेला दारु पिण्यास भाग पाडले होते.(Assam Murder Case: आसाममध्ये मुलाने मानसिक संतुलन बिघडल्याने जन्मदात्या आईची केली हत्या, गुन्हा दाखल करत पोलिसांनी घातल्या बेड्या)

घटना बस अड्ड्याच्या जवळ रुग्णालयाच्या एका रुममध्ये झाली आहे. या घटनेनंतर आरोपीने पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयाच्या सुरक्षा गार्डने पोलिसांना सुचना दिली. पोलीस बस अड्ड्याजवळ लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.(हिंदू व्यक्तीसोबत लग्न केलेल्या त्रिपुरा मधील मुस्लिम मुलीची 66 दिवसानंतर सुटका)

एका पोलीस अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, त्यांना या घटनेबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही. कारण पीडिता अद्याप शुद्धीत आलेली नाही. पीडितेला उपचारासाठी एका सरकारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वन टाउन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. महिला ही रुग्णालयातील कर्मचारी आहे की नाही आणि आरोपी तिला रुममध्ये घेऊन आला की नाही हे स्पष्ट झालेले नाही.