हिंदू व्यक्तीसोबत लग्न केलेल्या त्रिपुरा मधील मुस्लिम मुलीची 66 दिवसानंतर सुटका
Girl | File Photo

त्रिपुरा पोलिसांनी एका 16 वर्षीय मुस्लिम मुलीची सुटका केली आहे. या मुलीचे लग्न एका हिंदू व्यक्तीसोबत झाले होते आणि 66 दिवस ती बेपत्ता होती. पोलिसांनी मंगळवारी याची माहिती दिली आहे. पश्चिम त्रिपुरा येथील सिपाहीजाला जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक कृष्णेंदु चक्रवर्ती यांनी असे म्हटले की, पोलीस उपाधिक्षक अजय कुमार दास यांच्या नेतृत्वाखील एका पोलीस दलाकडून मुलीची सुटका करण्यात आले आहे. तसेच तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी IANS यांना असे सांगितले की, त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या परवानगीने मुलगी आणि मुलाबद्दल पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

पोलिसांना असे कळले की, मुलगी ही दोन महिन्यांची गर्भवती आहे. परंतु पोलिसांनी आता या घटनेसंदर्भात हिंदुत्व संघटनेचे नेते तपन देबनाथ यांच्यासह पाच लोकांना अटक केली आहे. चक्रवर्ती यांनी असे म्हटले की, मुलगी विशालगढ येथील 9 वी इयत्तेतील विद्यार्थिनी आहे. तिचे एका मुलावर प्रेम होते आणि त्यानंतर तिने 23 वर्षीय सुमन सरकार याच्यासोबत लग्न केले. लग्न केल्यानंतर तिचे हिंदूत धर्मांतर झालेय 24 जुलै पासून दांपत्य हे बेपत्ता होते. पोलिसांनी दोन महिन्यांहून अधिक वेळ राज्यभरात या दोघांचा शोध घेतला. तसेच मोठ्या स्तरावर या दोघांचा तपास ही सुरु ठेवला. पोलीस प्राधिकरण यांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवले आहे.(Uttar Pradesh: मदरसामध्ये लहान मुलांवर अमानुष अत्याचार; साखळदंडाने बांधून ठेवले पाय, Video व्हायरल)

पोलिसांच्या द्वारे सुरुवातीला मुलीला सोडवण्यासाठी प्रथम कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर तिच्या वडीलांनी हायकोर्टात तक्रार दाखल केली. मुख्य न्यायाशीध अकील कुमार कुरैशी आणि न्यायमूर्ती सत्य गोपाल चट्टोपाध्याय यांच्या त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पोलिसांना मुलीचा शोध घेण्यासह तिला लवकरात लवकर कोर्टात हजर करण्याचे निर्देशन दिले. या घटनेवरुन विविध राजकीय आणि अन्य मंडळांमध्ये व्यापक रुपात वाद झाले.