पीएनबी घोटाळ्यातील (PNB Scam) फरार हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याचा जामीन अर्ज लंडनच्या वेस्टमिंस्टर कोर्ट (London's Westminster Court) पुन्हा एकदा फेटाळला आहे. तसंच नीरव मोदी याची कोठडी 22 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी जून महिन्यात ब्रिटनच्या एका न्यायालयात नीरव मोदी यांची कोठडी 25 जुलै रोजी वाढवण्यात आली होती. नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 2 अरब डॉलर्सचा घोटाळा करुन फरार झाला आहे. यावर्षी मार्च महिन्यात लंडनमध्ये त्याला अटक करण्यात आली. (घोटाळेबाज नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांना ठेवण्यासाठी हायटेक कारागृह, आर्थर रोड जेल मध्ये केली जातेय 'अशी' तयारी)
नीरव मोदी विरोधात गेल्या वर्षी मे आणि जुलै महिन्यात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी नीरव मोदी याच्या प्रत्यर्पणासाठी आग्रह केला. त्यानंतर 2 जुलै रोजी सिंगापूर उच्च न्यायालयाने पीएनबी घोटाळा प्रकरणी नीरव मोदीची बहिण आणि बहिणीचा नवरा यांच्या बँकेत जमा असलेले 44.41 कोटी रुपये जप्त करण्याचे आदेश दिले होते. (PNB Scam: नीरव मोदी ने PNB ला व्याजासहित 7300 कोटी रुपये देण्याचा DRT चा आदेश)
ANI ट्विट:
Fugitive billionaire jeweller Nirav Modi's custody extended till August 22 by London's Westminster Court (file pic) pic.twitter.com/7RO9IxX1kg
— ANI (@ANI) July 25, 2019
नीरव मोदी आणि त्याचा साथीदार मेहुल चोक्सी याने काही बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने 13,500 कोटी रुपयांचा पीएनबी बँकेत घोटाळा केला. त्यानंतर सीबीआय आणि इडी या प्रकरणी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचा तपास करत आहेत.