PNB Scam: नीरव मोदी ने PNB ला व्याजासहित 7300 कोटी रुपये देण्याचा DRT चा आदेश
File image of fugitive jeweller Nirav Modi | (Photo Credits: ANI)

पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) कोट्यावधींचा घोटाळा करुन फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याला पुण्यातील कर्ज वसुली कोर्टाने (डीआरटी) चांगला दणका दिला आहे. पंजाब नॅशनल बँकेला व्याजासहित 7300 कोटी रुपये द्यावेत, असा आदेश डीआरटीने दिला आहे. (घोटाळेबाज नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांना ठेवण्यासाठी हायटेक कारागृह, आर्थर रोड जेल मध्ये केली जातेय 'अशी' तयारी)

ANI ट्विट:

यापूर्वी सिंगापूरच्या हायकोर्टाने नीरव मोदीचे ब्रिटन मधील नोंदणीकृत असलेली कंपनीचे बँक खाते गोठवण्याचे आदेश दिले होते. या खात्यात असलेले तब्बल 44.41 कोटी रुपये हे गुन्ह्यातील पैसे असल्याचे कोर्टाने सांगितले होते. या बँक अकाऊंटमध्ये पीएनबी घोटाळ्यातील रक्कम अवैध पद्धतीने पाठवण्यात आली होती.

तर यापूर्वी स्वित्झर्लंडच्या प्रशासनानेही नीरव मोदी आणि त्याच्या बहिणीच्या चार स्विस बँकेच्या खात्यांमधून होणाऱ्या व्यवहारांवर 27 जून रोजी रोख लावली होती.