Twitter | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

नव्या डिजिटल नियमांचे पालन पूर्ण क्षमतेने न केल्याने कायदेशीर संरक्षण गमावलेली सोशल मीडिया (Social Media) साईट ट्विटर अधिकच अडचणीत आली आहे. ट्विटरवर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या हळूहळू चांगलीच वाढत आहे. ही संख्या आता चारवर पोहोचली आहे. या आधी ट्विटरवर विविध कलमांखाली तिन गुन्हे दाखल झाले होते. ट्विटरवर दाखल झालेला चौथा गुन्हा हा चाईल्ड पोर्नोग्राफी कंटेट (Child Pornography Content) संदर्भात आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर शाखेने ट्विटरवर मंगळवारी (29 जून) हा गुन्हा दाखल केला. राष्ट्रीय बाल अधिकार सुरक्षा आयोग द्वारा प्राप्त तक्रारीवरुन ट्विटरवर हा गुन्हा दाखल करण्यात आला. ट्विटरवर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा पॉक्सो (Posco) आणि आईटी (IT) कायद्यान्वये आहे.

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने ट्विटरविरुद्ध दाखल केलेला हा ताजा गुन्हा आहे. ष्ट्रीय बाल अधिकार सुरक्षा आय़ोग (National Commission for Protection of Child Rights) ने दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीत म्हटले आहे की, मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर वर लहान मुलांबाबत अश्लील माहिती (Child Pornography) वारंवार पोस्ट केली जात आहे. त्यावरुन NCPCR द्वारा सायबर सेलकडे अधिकृतरित्या तक्रार दाखल करण्यात आली होती. आयोगाने दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाला 29 जूनला हजर होण्याबाबतही आदेश दिले होते. आयोगाद्वारे लिहिलेल्या पत्रात सायबर सेल आणि दिल्ली पोलिस कमिशनर यांचा उल्लेख होता.

दरम्यान, या आधी उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील एका मुस्लिम नागरिकाला मारहाण केल्याच्या घटनेत सामाजिक संबंध बिघडवल्याच्या आरोपाखाली ट्विटरवर गुन्हा दाखल आहे. या संदर्भात ट्विटर इंडियाच्या एमडींना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आले आहे. बारतात ट्विटरचे एमडी मनीष माहेश्वरी यांना हे नोटीस पाठविण्यात आले आहे. दरम्यान, माहेश्वरी यांना कर्नाटक न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्याबद्दलही ट्विटरवर गुन्हा दाखल आहे. ट्विटरवर जम्मू कश्मीर आणि लद्दाख हा भाग भारतापासून वेगळा दाखविण्यात आला होता. त्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातही माहेश्वरी यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.