टिकटॉक (TikTok Video) च्या व्हिडिओसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या अनेकांची उदाहरणे आपण आतापर्यंत पाहिली आहेत, काही महाभागांनी तर यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याशी मागे पुढे पाहिलेले नाही, मात्र वडोदरा (Vadodara) मधून समोर येणारे एक वृत्त या सर्व उदाहरणांपेक्षा कित्येक पट गंभीर आणि धक्कादायक आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वडोदरा येथे शेतात काम करणाऱ्या चार विकृत कामगारांनी एका सापाला जीवे मारून त्याला चक्क जाळतानाचा एक टिक टॉक व्हिडीओ बनवला आहे. जगदीश वाघेला, प्रवीण वाघेला, विक्रम वाघेला आणि भारतसिंह वाघेला अशी या चारही गुन्हेगारांची नावे असून गुजरात वन्य विभागाकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी: Tik Tok चा व्हिडीओ बनवताना चुकून गोळी चालवली गेल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू
वन्य विभागाच्या माहितीनुसार, हे चारही वाघेला बंधू शेतात काम करत असताना त्यांनी 5 मार्च रोजी एका झुडुपातून या सापाला जाताना पहिले त्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले आणि सापासोबाबत खेळू लागले. इतक्यात त्यांच्यातील एकाने टिकटॉकचा व्हिडीओ काढायला सुरुवात केली, ज्यासाठी अन्य तिघांनी सापाला काठीने दगडांनी मारण्यास सुरुवात केली. असे करताच सापाचा मृत्यू झाला, मग त्या नंतरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये या तरुणांनी सापाला चक्क जाळून टाकले आणि त्याही घटनेचा व्हिडीओ बनवुन अपलोड सुद्धा केला.
दुसरीकडे हाच व्हिडीओ राजकोट मधील एका व्यक्तीने पाहताच त्याने या अकाउंटवर कमेंट करता त्या चौघांचे ठिकाण विचारले. या व्यक्तीला सुद्धा आपला फॅन समजून चौघांनी आपण बालसिनोर मधील असल्याची माहिती दिली त्यानंतर संबंधित व्यक्तीने थेट वन्य विभागाला याची माहिती देऊन त्यांना सुधदा आहे व्हिडीओ दाखवला. याप्रकरणी पोलिसांनी सुद्धा लगेचच तपास सुरु करून स्थानिकांच्या मदतीने चौघांचा शोध घेतला आणि रविवारी त्यांना अटक करण्यात आली.
टिक-टॉक करिता धावत्या रेल्वेतून जीवघेणी स्टंटबाजी करणे पडले महागात; थोडक्यात बचावला तरूणाचा जीव
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी वाघेला भाऊंची चौकशी केली असता त्यांनी आपल्याला सापाला मारणे हा गुन्हा असल्याचे ठाऊक नव्हते असे सांगितले आम्ही केवळ गमतीत सापाला मारले आणि नंतर त्याच्या अवशेषांना तसेच कसे ठेवणार असा विचार करून सापावर अंत्यसंस्कार केले असे या चोघांनी पोलिसांना सांगितले.