Captain Amarinder Singh | (Photo Credits: Facebook)

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. 'पंजाब लोक कांग्रेस' (Punjab Lok Congress) असे या पक्षाचे नाव आहे. अत्यंत जुने आणि ज्येष्ठ नेते असलेल्या 78 वर्षीय अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना 7 पानांचे पत्र लिहून काँग्रेस (Congress) पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी हे पत्र राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) यांनाही लिहीले आहे. अमरिंदर सिंह यांनी हे पत्र आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केले आहे.

पाठिमागील अनेक दशकांपासून माजी मुख्यमत्री अमरिंदर सिंह हे काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, सोनिया गांधी यांनी राहुल गांधी आणि प्रयिंका गांधी यांना आळा घालण्यासह, नवजोत सिंह सिद्दू यांना अभय दिल्याचा आरोप केला आहे. नवजोत सिंह हे एक अस्थिर व्यक्तीमत्व आहे. त्यांनी पाकिस्तानच्या प्रति मवाळ भूमिका नेहमीच ठेवली आहे. अशा व्यक्ती पक्षाने अभय दिल्याचे कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, BJP मध्ये प्रवेश करत नाही पण काँग्रेस सोडत आहे, आता अपमान सहन होत नाही- अमरिंदर सिंह)

ट्विट

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पत्रात म्हटले आहे की, सिद्धू यांनी सोनिया गांधी यांच्या डोळ्यात चतुराईने जागा मिळवली. त्यासाठी त्यांना महासचिव हरीश रावत यांचेही सहकार्य मिळाले. आमदारांच्या बैठकीचा हवाला देत कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटले आहे की, मला कमी दाखविण्यासाठीच आणि माझा अपमान करण्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी सोनिया गांधी यांनी आपल्याला फोन केला आणि आपल्या पदाचा राजीनामा मागितला, असा आरोप केला आहे.