UP Women's Commission: 'कधी कधी अक्कल गवत खायला जाते'; महिला आयोग सदस्या मीना कुमारी यांच्या वक्तव्यावर भडकले माजी IAS.
Phone | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेश महिला आयोग (Uttar Pradesh Women's Commission ) सदस्या मीना कुमारी (Meena Kumari) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह (Former IAS officer, Surya Pratap Singh) चांगलेच भडकले आहेत. आपल्या ट्विटर हँडलवरुन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सूर्य प्रताप सिंह यांनी म्हटले आहे की, 'उत्तर प्रदेशमध्ये बेटी बचावचा नवा नारा. मुलीकडून मोबाईल काढून घ्या. यांच्या जिन्समध्ये नव्हे तर मेंदूत छिद्र आहे. त्यामुळे हाथरस, उन्नाव बदायूं, कासगंज यांसारख्या घटना घडतात.' सूर्य प्रताप सिंह पुढे म्हणतात की, मुलांसोबत बोलतात, उठतात-बसतात आणि पळून जातात. हे म्हणजे यांची अक्कल कधी कधी गवत खायला जाते. त्यामुळेच त्यांनी असे विधान केले असावे.

उत्तर प्रदेश महिला आयोग सदस्यांनी मात्र महिला अत्याचारांबाबत बोलताना भलताच जावई शोध लावला आहे. उत्तर प्रदेशच्या महिला आयोग सदस्या मीना कुमारी यांनी म्हटले आहे की, पालकांनी मुलींना मोबाईल देऊन नये. मोबाईल वापरुन मुली मुलांसोबत बोलतात आणि पुढे याच मुली त्या मुलांसोबत पळून जातात. त्यामुळे समाजातील नागरिकांनी पुढे यावे आणि आपल्या मुली कोणाशी बोलतात यावर लक्ष ठेवावे. (हेही वाचा, Uttar Pradesh: 'मुलींना फोन दिल्यानेच वाढतात त्यांच्यावरील अत्याचार'; महिला आयोगाच्या सदस्याचे वादग्रस्त विधान)

मीना कुमारी यांनी पालकांना सल्ला दिला आहे की, त्यांनी मुलींच्या हाता मोबाईल देऊच नये. तसेच, त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवावे. सर्वात आधी मी मुलींच्या आईंना सांगेन की त्यांनी आपल्या मुलीकडे लक्ष द्यावे. हे जे सर्व घडते ते मुलींच्या आईने लक्ष दिले नाही म्हणून घडते, असेही मीना कुमारी यांचे म्हणने आहे.

सूर्य प्रताप सिंह ट्विट

दरम्यान, मीना कुमारी यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. तरीही मीना कुमारी यांनी म्हटले आहे की, आपण आपल्या विधानावर ठाम आहोत. आपल्या विधानावर ठाम राहात त्यांनी म्हटले आहे की, मी केवळ मुलीच नव्हे तर मुलांना उद्देशनुही हे विधान केले होते. मला वाटते की, अल्पवयीन मुलगा आणि मुलगी यांचे मोबाईल आपण सातत्याने तपासले पाहिजेत. कुटुंबीयांनी हे वारंवार करायला पाहिजे .

आपल्या विधानानंतर मीनाकुमारी चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे की, मुलींच्या आतात फोन आल्यामुळे त्या बलात्काराचे कारण ठरत नाही. विकृत मानसिकता हेच बलात्काराचे कारण आहे. ही विकृतीच गुन्हेगारांचे धाडस वाढवते, असेही मालीवाल यांनी म्हटले आहे.