Uttar Pradesh: 'मुलींना फोन दिल्यानेच वाढतात त्यांच्यावरील अत्याचार'; महिला आयोगाच्या सदस्याचे वादग्रस्त विधान
Mobile Phone (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

महिलांवरील अत्याचार ही नेहमीच देशातील एक प्रमुख समस्या राहिली आहे. समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा म्हणून वरचेवर जनजागृती केली जाते. उत्तर प्रदेश महिला आयोगाचे (Uttar Pradesh Women's Commission) काम महिलांच्या हक्कांचे रक्षण करणे आहे, परंतु आता आयोगाच्या एका महिला सदस्याने महिलांविषयीच वादग्रस्त विधान केले आहे. आयोगाच्या सदस्या मीना कुमारी (Meena Kumari) सांगतात की, मुलींना मोबाइल फोन देऊ नये. महिलांवरील वाढत्या गुन्ह्यामागे मोबाइल फोनचा उपयोग हे कारण आहे. मुली मुलांबरोबर तासनतास मोबाईलवर बोलत असतात म्हणूनच जरी आपण त्यांना मोबाइल दिला तर त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा.

उत्तर प्रदेशातील अलिगड येथे मीना कुमारी यांनी येथे असे निवेदन दिले की, समाजात स्त्रियांवरील अत्याचाराची प्रकरणे थांबत नाहीत. आपल्याला आपल्या मुलींवर लक्ष ठेवायला हवे. आपल्या मुली कोठे जात आहेत आणि कोणत्या मुलासह आहेत हे पाहावे लागेल. मी सर्वांना सांगते की मुली मोबाइलवर बोलत राहतात आणि ही गोष्ट इतकी टोकाला जाते की मी मुली त्या मुलासोबत घरातून पळून जातात. मीना कुमारी पुढे म्हणाल्या की, कुटुंबातील सदस्यांनी मुलींना मोबाईल देऊ नये तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे.

पुढे त्यांनी मुलींच्या आयांनाही लक्ष केले. त्या म्हणाल्या, सर्वप्रथम मी आयांना त्यांच्या मुलींची काळजी घेण्यास सांगते, हे सर्व आईच्या निष्काळजीपणामुळे होते. समाजातील महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीविषयी स्वत: समाजाने गंभीर असले पाहिजे. अशा परिस्थितीत मोबाइल ही एक मोठी समस्या बनली आहे. आज तकशी खास संभाषणात उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी म्हणाल्या की, मी माझ्या विधानावर कायम आहे. मी फक्त मुलींबद्दलच नाही तर मुलांबद्दलही निवेदन दिले होते. (हेही वाचा: हरियाणा मध्ये 10 वर्षीय मुलीवर शाळेच्या परिसरात 7 जणांकडून बलात्कार; किळसवाण्या घटनेचा व्हिडिओ मुलीच्या बापाला व्हॉट्सअ‍ॅप वर पहायला मिळाला)

मीना कुमारी यांच्या या या विधानावर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या, 'मुलीच्या हातात फोन हे बलात्काराचे कारण नाही, तर बलात्काराचे कारण अशी वाईट मानसिकता आहे ज्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढते.