हरियाणा मध्ये 10 वर्षीय मुलीवर शाळेच्या परिसरात 7 जणांकडून बलात्कार; किळसवाण्या घटनेचा व्हिडिओ मुलीच्या बापाला व्हॉट्सअ‍ॅप वर पहायला मिळाला
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये आजही महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. हरियाणामध्ये (Hariyana) एका 10 वर्षाच्या मुलीवर तिच्या शाळेच्या परिसरामध्येच 7 जणांकडून बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 6 जण अल्पवयीन असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये किळसवाणा प्रकर म्हणजे बलात्काराचा हा प्रकार शूट करण्यात आला असून व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) वर त्याचा व्हिडिओ देखील वायरल झाला आहे. मुलीच्या बापाला देखील हा प्रकार व्हॉट्सअ‍ॅप वर पहायला मिळाला. त्याच्या आधारे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नक्की वाचा: मॅट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून एकाच पुरुषाकडून 12 महिलांवर बलात्कार, नवी मुंबई पोलिसांकडून अटक.

दरम्यान हरियाणाच्या रेवाडी मधील रामपूरा पोलिस स्टेशन मध्ये या बलात्कराची तक्रार नोंदवण्यात आली. मीडीया रिपोर्ट्सनुसार, 24 मे दिवशी पीडीत मुलगी घराजवळ असलेल्या मैदानात खेळत होती. तेव्हा काही मुलांनी तिच्यावर जबरदस्ती करत सामुहिक बलात्कार केला. या घटनेतील मुलं ही 8-14 वर्षांची आहेत. तर एक जण 18 वर्षांवरील आहे. या मुलांनी घटनेचा व्हिडिओ शूट केला आणि शेअर केला. त्यानंतर तो व्हॉट्सअ‍ॅप वर वायरल झाला. दरम्यान हा व्हिडिओ मुलीच्या वडिलांनाही मिळाला. हा व्हिडिओ पाहून त्यांना धक्का बसला.

सध्या पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून संबंधित आरोपी मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मुलांची कसून चौकशी सुरू आहे. (नक्की वाचा: Bihar: बारबालांना पिंजऱ्यात कैद करुन नाचवले, बघ्यांची रस्त्यावर तुफान गर्दी).

दरम्यान देशामध्ये मुलींच्या आणि स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. अशा बलात्काराच्या घटनांमध्ये तातडीने आरोपींना ताब्यात घेऊन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची प्रक्रिया मागणी मागील काही वर्षांपासून जोर धरत आहे.