Presidential Rule: उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा- अखिलेश यादव
Akhilesh Yadav (Photo Credits-Twitter)

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister of Uttar Pradesh), समाजवादी पक्ष (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर हल्ला चढवत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप केला आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थाच नसल्यामुळे राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य असल्याचेही ते म्हणाले.

सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुढे म्हटले आहे की, भाजपा सरकारच्या काळात राज्यात कायदा व सुव्यवस्था अगदी बिघडून गेली आहे. सरार आपल्या घटनात्मक जबाबदारीपासून दूर झाले असून वेगळ्याच कामात गुंतले आहे. त्यामुळे राज्यावरील संकट कमी होत नाहीत. उलट ती वाढतच चालली आहेत. अशा स्थितीत राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य आहे.

पुढे बोलताना अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखत नाही. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूर येथून अपहरण झालेल्या 14 वर्षीय बलराम गुप्ता हत्या प्रकरणात आपल्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पीडितेला पाच लाख रुपये दिले. समाजवादी पक्ष मागणी करतो आहे की, मुख्यमंत्र्यांनी पिडितेला कमीत कमी 50 लाख रुपये द्यावेत. कानपू येथे संजीत यादव हत्या प्रकरणातही सरकारने पीडितेला 50 लाख रुपये द्यायला हवेत.  (हेही वाचा, Vikas Dubey Encounter: विकास दुबे एन्काऊंटर वर ओमर अब्दुल्लाह, अखिलेश यादव, प्रियंका गांधी यांनी केला सवाल, पहा ट्विट)

अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी आतापर्यंत कानपूह हत्या प्रकरणातील संजीत यादव याचा मृतदेह शोधला नाही. ही बाब भाजप सरकारसाठी अत्यंत शरमेची आहे. भाजप सरकारच्या काळातच उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था गंभीर झाली आहे, असा आरोपही अखिलेश यादव यांनी केला आहे.