Vikas Dubey Encounter: विकास दुबे एन्काऊंटर वर ओमर अब्दुल्लाह, अखिलेश यादव, प्रियंका गांधी यांनी केला सवाल, पहा ट्विट
Vikas Dubey| Photo Credits: Twitter/CCTV)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर इन्काऊंटर (Kanpur Encounter) प्रकरणातील मास्टर माईंड विकास दुबे (Vikas Dubey) याचा आज उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स च्या हातून एन्काउंटर झाला आहे. कानपूर मध्ये 8 पोलिसांची हत्या करण्याचा आरोप असलेल्या विकास दुबे याला काल पोलिसांनी उज्जैन (Ujjain) येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर विकास दुबे याला परत आणण्याची जबाबदारी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स वर सोपवण्यात आली होती. विकास दुबे याला मध्य प्रदेशातून कानपूरला परत आणणारी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सची एक गाडी पलटली. पलटलेल्या गाडीतून विकास दुबे याने पळ काढण्याचा प्रयत्न केला अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र या स्पष्टीकरणावर अनेक नेत्यांनी सवाल केला असून अप्रत्यक्ष आरोप लगावण्यात आला आहे. आरोप करणाऱ्यांमध्ये ओमर अब्दुल्लाह (Omar Abdullah), अखिलेश यादव (Akhilesh Yadav), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) या नेत्यांचा समावेश आहे.

ओमर अब्दुल्लाह यांनी विकास दुबे च्या एन्काउंटर प्रकरणी ट्विट करत म्हंटले की,"मृत माणसे कथा सांगत नाहीत". विकास दुबे कडे असणारी काही माहिती सरकारसाठी घातक ठरू शकते आणि ती माहिती बाहेर पडू नये म्हणून त्याचा एन्काउंटर करण्यात आला असे अब्दुल्लाह यांनी अस्पष्टपणे म्हंटले आहे. Kanpur Encounter:  कुख्यात गँगस्टर विकास दुबे याची पतनी ऋचाही आता 'मोस्ट वॉन्टेड'

ओमर अब्दुल्लाह ट्विट

प्रियंका गांधी यांनी सुद्धा सवाल करत, अपराधी तर मारला गेला पण अपराधी प्रवृत्तीला संरक्षण देणाऱ्यांचा अंत कधी होणार असे ट्विट केले आहे.

प्रियंका गांधी ट्विट

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सुद्धा विकास दुबे ची गाडी पलटलेली नाही तर सरकार पलटू नये यासाठी केलेली ही हत्या आहे अशा शब्दात ट्विट केले आहे.

अखिलेश यादव ट्विट

दरम्यान, विकास दुबे याच्या एन्काउंटर दरम्यान झालेल्या चकमकीत चार पोलीस सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांना लाला लजपतराय हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.