Food Poisoning: मतदान केंद्राजवळ खाल्लेल्या पोह्यांमुळे अन्नातून  20 जणांना विषबाधा,  Fatehgunj येथील घटना
Food Poisoning | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Food Poisoning At Fatehgunj: लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी सुरु असलेल्या मतदानाच्या दिवशी 20 जणांना अन्नातून विषबाधा झाली. यातील एक डझनहून अधिक जण रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत आहेत. ही घटना नवयार्ड जवळील सूर्यनगर (Suryanagar), फतेहगंज परिसरात मंगळवारी (7 मे) घडली. प्राप्त माहितीनुसार, हे सर्व पीडित मजूर आहेत. त्यांना मतदानासाठी मतदान केंद्रावर (Polling Booth) आणण्यात आले होते. या वेळी त्यांना पोहे आणि तत्सम न्याहरी देण्यात आली होती. जी खाल्यानंतर त्यांना पोटदुखी, मळमळणे आणि उलट्या अशी लक्षणे आणि त्रास उद्भवला. लक्षणे आणि त्रास जाणवू लागल्यानंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोह्यांचा नाष्टा, पीडितांना त्रास

टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्रकाश भुरिया हे पीडित मजुरांना घेऊन रुग्णालयात गेले. त्यांनी सांगितले की, मतदानसाठी आल्यानंतर त्यांना कोणीतरी सूर्यनगर येथील मतदान केंद्राजवळ मोफत वाटले जाणारे पोहे खायला दिले. पोह्यांचा नाष्टा केल्यानंतर पीडितांना त्रास उद्भवला, अन्नातून विषबाधा झाली. भुरिया यांनी सांगितले की, कामावर जात असताना कोणीतरी त्यांना पोहे दिले, जे त्यांनी नंतर आजारी पडण्यापूर्वी खाल्ले. भुरियाच्या म्हणण्यानुसार, मेहसानानगर, अभिलाषा क्रॉसरोड, साम आणि फतेहगंज भागातील सुमारे 25 मजूर आणि त्यांच्या कुटुंबांनी वाटप केलेल्या पोहे खाल्ले. ज्यानंतर त्यांना त्रास सुरु झाला. (हेही वाचा, Boy Died After Eating Shawarma: चिकन शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेकांना विषबाधा; मानखुर्द परिसरातील घटना)

पोहे वाटणारे राजकीय पक्षाशी संबंधीत

दरम्यान, सर्वोतोपरी प्रयत्न करूनही, मजुरांना दूषित अन्नाचा स्रोत शोधता आला नाही. पोहो वाटणारे लोग कोणत्या तरी राजकीय पक्षाशी संबंदीत होते. वितरण करताना ते उपस्थित होते. मात्र, मजूरांना त्यांची ओळख पटवता आली नाही. बहुतेक पीडित हे मध्य प्रदेशातील आहेत आणि झोपडपट्टीत राहतात, ते परिसरात अनौपचारिक मजूर म्हणून काम करतात. सर्व रुग्णांची तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांनी पीडितांना अन्नातून विषबाधा झाल्याचे निदान केले. डॉक्टरांना पीडितांमध्ये उलट्या आणि जुलाब होणे, पोटदुखी, पोटफुगी आणि मळमळण्याची लक्षणे दिसून आली. (हेही वाचा, Punjab Shocker: वाढदिवसादिवशी ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा; 10 वर्षांच्या Birthday Girl चा मृत्यू)

मदनानादिवशी अनेक राजकीय पक्ष विविध मतदान केंद्रांवर आहाराची सुविधा उपलब्ध करतात. मतदारांना आकृष्ट करण्यासाठी आणि त्यांना आपल्याबाजुने वळविण्यासाठी ही सेवा देऊ केली जाते. याशिवाय आपण मतदारांची चांगली सोय केली असा दवा करत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना यामुळे रुबाबही झाडता येतो. त्यामुळे विविध कार्यकर्ते, स्थानिक नेते मतदारांसाठी नाष्टा, जेवण आदींची सोय करतात. दरम्यान, त्यासाठी दिले जाणारे कंत्राटही मोठे असते. त्यामुळे त्यात गुणवत्तापडताळणी केली जातेच असे नाही. परिणामी विषबाधेसारखे प्रकार घडत असतात.