MahaKumbh Fire | (Photo Credit - X/ANI)

महाकुंभमेळा सुरु असलेल्या प्रयागराज (Prayagraj) येथील सेक्टर 18 येथे पुन्हा एकदा आग (Maha Kumbh Fire) लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेबाबत माहिती देताना खाक चौक पोलीस स्टेशनचे इन्पेक्टर योगेश चतुर्वेदी यांनी सांगितले की, शहरातील ओल्ड जीटी रोड परिसरात असलेल्या तुलसी चौकाजवळ असलेल्या एका ठिकाणी आग लागली आहे. आगीची माहिती कळताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली आणि अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असले तरी, अद्यापही सदर ठिकाणी थंडावा करण्याचे काम सुरु आहे. या घनटेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आगीच्या घटनेची पुनरावृत्ती

महाकुंभमेळा सुरु असलेल्या परिसरात आग लागण्याची ही काही पहिलीच घटना नाही. या आधी याच परिसरात सेक्टर आठमध्ये भ्रष्टाचार निवारण केंद्राच्या शिबीरात अचानक आग लागली होती. त्याही वेळी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी हजेरी लावत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत एक तंबू जळून खाक झाला होता. त्याच दरम्यान नवप्रयागाम पार्किंग परिसरातील एका कचऱ्याच्या ढिगासही मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. जी फायर ब्रिगेडने नियंत्रणात आणली.

वृत्तसंस्था पीटीआयने पोलीस निरिक्षकाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जुन्या जीटी रोडवरील तुलसी चौराहाजवळील एका छावणीत आग लागली. तथापि, अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. अग्निशमन विभागाचे अधिकारी या कारवाईचे निरीक्षण करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.

दरम्यान, याच कुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. रुद्राक्षाचे माळे धरून आणि मंत्रोच्चार करत पंतप्रधानांनी नदीत उभे राहून प्रार्थना केली. गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती यांचे संगम असलेल्या त्रिवेणी संगमावर पोहोचण्यासाठी मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोटीने प्रवास केला. पौष पौर्णिमा (13 जानेवारी) रोजी सुरू झालेला महाकुंभ 2025हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा आहे, जो जगभरातील भाविकांना आकर्षित करतो. तो 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहील. 12 वर्षांनंतर होणाऱ्या महाकुंभात आतापर्यंत भारत आणि जगभरातून 38 कोटींहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत, असे उत्तर प्रदेश सरकारच्या म्हणण्यानुसार, या महामेळ्याचे आयोजन करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.