काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज संसदेच्या बाहेर राहुल यांनी पत्रकारांशी संवाद साधला, देशावर कोरोना व्हायरस (Coronavirus) पेक्षा मोठे संकट येणार आहे, हे संकट आर्थिक आपत्तीचे (Financial Crisis) असणार आहे. लोकांना येत्या सहा महिन्यात देशात आर्थिक त्सुनामी पाहायला मिळेल, यासाठी सरकार तरी काहीही पाऊले उचलत नाहीये त्यामुळे लोकांनीच सहन करण्याची तयारी करून घ्यावी अशा शब्दात त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला (Narendra Modi Government) उपरोधक सल्ला दिला आहे. असाच सल्ला आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा सरकार दिला होता मात्र तेव्हा सुद्धा आपले न ऐकल्याने आता मोठे संकट सहन करावे लागत आहे. अशीही नाराजी राहुल यांनी व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी सरकारवर टीका करताना एक प्रसंग सांगत म्हंटले की, "जेव्हा अंदमान-निकोबार मध्ये त्सुनामी पूर्वी समुद्राचं खाली गेलं होतं तेव्हा लोक मासे जमा कार्याला पुढे गेले आणि त्यानंतर पाण्यानेच त्यांना दणका दिला. असेच आता अर्थव्यवस्थेतही सर्वकाही आता तळाला जात आहे. पुढे काय होणार आहे याचा अंदाज अजून सरकारला आलेला नाहीए. पुढच्या सहा महिन्यात कल्पना करता येणार नाही, अशा परिस्थितीचा सामना जनतेला करावा लागणार आहे. मोठी आर्थिक त्सुनामी येणार आहे, हे मी आधीच सांगतोय, मात्र माझे मत कोणीही विचारात घेत नाहीये".
ANI ट्विट
#WATCH Congress MP Rahul Gandhi: It is like a tsunami is coming. India should be preparing itself not just for #Coronavirus but for the economic devastation that is coming. I am saying it again & again. Our people are going to go through unimaginable pain in the next 6 months. pic.twitter.com/Pk6cMDVhNr
— ANI (@ANI) March 17, 2020
दुसरीकडे, कोरोनाच्या बाबत बोलताना, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मी याचा इशारा अगोदरच दिला होता तेव्हा पण सरकार केवळ चर्चा करत राहिले उपाययोजना केल्या गेल्या नाहीत यामुळेच आता हे संकट ओढवले आहे असे राहुल गांधी यांनी म्हंटले. सध्या देशातील कोरोना रुग्णांची संख्या 125 इतकी झाली आहे. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, यंदा भारताचा आर्थिक विकास दर 5.3 टक्के राहणार आहे असा अंदाज आहे मात्र आता जगभरात आलेल्या मंदीचा आणि कोरोनामुळे प्रभावित झालेल्या बाजाराचा फटका अर्थव्यवस्थेला बसू शकतो असे एकूण मत राहुल यांनी व्यक्त केले आहे.