Finance Minister Nirmala Sitharaman | (Photo credits: ANI)

वस्तू आणि सेवा कर काऊन्सिंलची 41 वी बैठक (41st GST Council Meeting) आज (27 ऑगस्ट) होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडेल. MoS वित्त अनुराग ठाकूर (MoS Finance Anurag Thakur) यांच्याशिवाय राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे वित्तमंत्री आणि केंद्र सरकार व राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. अशी माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे सर्वच राज्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात जीएसटीची भरपाई कशी करता येईल, हा बैठकीतील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असू शकतो.

रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस संकटामुळे मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या चार महिन्यात राज्यांना नुकसान भरपाई मिळू शकलेली नाही. म्हणून या बैठकीत राज्यांना नुकसान भरपाई कशी द्यावी यावर विचार होऊ शकतो. (GST भरण्यास विलंब झाल्यास होऊ शकते मोठे नुकसान; 1 सप्टेंबरपासून Net Tax Liability वर आकारले जाणार व्याज)

ANI Tweet: 

नियमांनुसार, जीएसटी कलेक्शनमधील सुमारे 14% भाग राज्यांना देणे अनिवार्य आहे. जुलै 2017 मध्ये मोदी सरकारकडून जीएसटी लागू करण्यात आला होता. पहिल्या पाच वर्षात झालेल्या कोणत्याही महसुलाचे नुकसान लक्षात घेऊन केंद्राकडून नुकसान भरपाई देण्यात येईल, जीएसटी कायद्यांतर्गत राज्यांना सांगण्यात आले होते. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे आता केंद्र आणि राज्य यांच्यात हा वादाचा विषय बनला आहे.