Union Finance Minister Nirmala Sitharaman (Photo Credits: ANI)

जीएसटी काउंसिलची (GST Council) आज (14 मार्च) एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. तर जीएसटी काउंसिलच्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मोबाईल फोनवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन आता 18 टक्के करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच यापूर्वीपेक्षेच्या किंमतीपेक्षा आता स्मार्टफोनच्या किंमती वाढणार आहेत. जीएसटीची आज 39 वी बैठक पार पडली.जीएसटी काउंसिलच्या बैठकीत खते आणि चप्पल यांच्यावरील जीएसटी दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, टेक्सटाइल वस्तूंवरील सुद्धा जीएसटी दर तर्कसंगत करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. मात्र जीएसटी काउंसिलकडून मोबाईल फोनवरील जीएसटी आता 18 टक्के होणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तसेच बी2बी सप्लाय आणि एक्सपोर्ट्ससाठी GSTR-1 फॉर्म भरणे अनिवार्य असणार आहे.(7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ)

दरम्यान, आजच्या बैठकीला निर्मला सीतारमण यांच्यासह अन्य अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थिती लावली होती. बैठकीत देशातील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली. दिल्लीचे अर्थमंत्री मनीष सिसोदीया यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस हे एक आर्थिक संकटाची परिस्थिती आहे. त्याचा फटका संपूर्ण जगाला होत आहे. यामुळे नोकरीधंद्याचे सुद्धा फार मोठे नुकसान झाले आहे.