Hetero या औषध निर्माण करणार्या कंपनीने आज (29 जुलै) कोविड 19 वर रूग्णांसाठी वापरल्या जाणार्या Favipiravir या अॅन्टी व्हायरल औषधांच्या जेनेरिक औषध लॉन्च केले आहे. दरम्यान त्याच ब्रॅन्ड नेम 'Favivir' असेल तर एका गोळीची किंमत 59 रूपये इतकी असेल. दरम्यान हेटरो या भारतीय औषध निर्माण करणार्या कंपनीला DCGI कडून औषध बनवण्याचं आणि मार्केटिंग करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Favivir हे हेटरो कडून उपबब्ध करून दिले जाणारे दुसरे ड्रग आहे. यापूर्वी Covifor (Remdesivir)चे देखील जेनेरिक स्वरूपातील औषधं कोविड 19 च्या रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. Favivir ची क्लिनिकल ट्रायलमधील निष्कर्ष समाधानकारक असल्याचे तसेच कोविड 19 वर प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोना व्हायरस वरील लसीला मान्यता देणारा रशिया ठरु शकतो जगातील पहिला देश; 10 ऑगस्टपर्यंत घोषणा होण्याची शक्यता.
भारतामध्ये आजपासून रिटेल स्टोअर आणि हॉस्पिटलच्या फार्मसीमध्ये Favivir हे औषध हेटरो हेल्थ केअर लिमिटेड द्वारा उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र या औषधासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिब्शन आवश्यक आहे.
भारतामध्ये कोविड19 च्या माईल्ड ते मध्यम स्वरूपाची लक्षणं असणार्या रूग्णांना फेरिपिरावीर हे औषध दिले जाते. दरम्यान कोविड 19च्या औषधांचा, इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा, वाढीव दराने विक्री होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता हेटरो कडून जेनेरिक स्वरूपात हे औषध उपलब्ध करून दिले जात असल्याने सामान्य रूग्नांना मोठा दिलासा मिळणार आहे.