![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/BeFunky-collage-1-1-380x214.jpg)
भारतात गेल्या वर्षात टोल नाक्यांवर गाड्यांच्या लांबलचक रांगांपासून सुटका होण्यासाठी सरकारने फास्टॅग (FASTag) सर्व वाहनांसाठी अनिवार्य केले होते. त्यानंतर आता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फास्टॅग संदर्भातील नियमात काही बदल केले आहेत. या नव्या नियमानुसार देशभरातील वाहनांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा त्यांनी फिटनेस सर्टिफिकेट जारी करण्यासाठी गाडीवर लावण्यात आलेल्या फास्टॅगची माहिती द्यावी लागणार आहे.(वाहनांवर Fastag असूनही जर त्यामध्ये आढळल्या 'या' त्रुटी तर भरावा लागणार दुप्पट दंड)
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने NIC यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, VAHAN पोर्टलसह राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शन जोडण्यात आले आहे. जे 14 मे पासून कार्यान्वित झाले आहे. सध्या VAHAN सिस्टिम VIN/VRN च्या माध्यमातून FASTag ची माहिती मिळवत आहे. त्याचसोबत पत्रात असे ही म्हटले आहे की, नव्या गाडीच्या नोंदणीवेळी फास्टॅग बाबत माहिती असणे गरजेचे असणार आहे. कारण यामुळे वाहनचालक फास्टॅगचे पेसै इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून करत आहे की नाही हे तपासून पाहता येणार आहे.(Fastag बनवल्यानंतर चुकून सुद्धा करु नका 'हे' काम, नाहीतर खात्यामधून टोल वसूल केला जाईल)
सर्वात प्रथम 2017 मध्ये M आणि N श्रेणी अंतर्गत विक्री केलेल्या नव्या वाहनांवर FASTag अनिवार्य केले होते. तसेच बहुतांश नागरिकांनी फास्टॅग बँकेसोबत लिंक केले नव्हते. महत्वाची बाब म्हणजे देशातील कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फास्टॅगचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, फास्टॅग संदर्भात फसवणूक होत असल्याचे ही प्रकार समोर आले आहेत. ज्यामध्ये फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना फास्टॅगचे रिचार्ज करण्याचा नावाखाली एका व्यक्तीकडून तब्बल 75 हजार 481 रुपये लुटले होते. त्यामुळे जर तुम्हाला फास्टॅग करायचे असल्यास ते फोन कॉलिंगच्या माध्यमातून करु नये. त्याऐवजी नेहमीच कस्टमर केअरवर स्वत:हून फोन करुन या सुविधेचा लाभ घ्या. दुसरी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या कार्डचा पिन क्रमांक किंवा ओटीपी कोणासोबत ही शेअर करु नका.