जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मधील पुलवामा (Pulwama) येथील सीआरपीफच्या ताफ्यावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे देशभरातून पाकिस्तान (Pakistan) विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छतरापूर जिल्ह्यात पानाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पाकिस्तानला पान निर्यात करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
छतरपुर जिल्ह्यातील गढीमलहरा,महाराजपुर, पिपट,पनागप आणि महोबा येथे पानाचे उत्तम उत्पादन होते. त्यामुळे या जिल्ह्यातून भारताच्या काही शहरात येथील पानांची निर्यात केली जाते. त्याचसोबत पाकिस्तान आणि श्रीलंका येथे ही पानाची निर्यात केली जाते. परंतु पुलवामा हल्ल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनात पाकिस्तानबद्दल राग व्यक्त होत आहे. तसेच पाकिस्तानने आमच्या भारतीय जवानांनवर हल्ला केल्याने आम्ही त्यांना पान निर्यात करणार नाही. तसेच नुकसान झाले तरीही चालेल अशी भुमिका येथील शेतकऱ्यांनी ठाम मांडली आहे.(हेही वाचा-Pulwama Terror Attack नंतर जम्मू काश्मिर मध्ये तैनात केलेली अतिरिक्त कुमक निवडणुकांसाठी; राज्यपाल सत्यपाल मलिक)
तत्पूर्वी छतरपूर येथील पान मेरठ आणि शहारंगपुर येथे पाठवण्यात येते. प्रत्येक आठवड्याला 45 ते 50 पानांच्या जुड्या पाकिस्तानात पाठवल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांची एका जुडीमागे 30 हजार रुपयांची कमाई होते. तसेच या पूर्वी मध्यप्रदेशातील झाबुआ मधील टॉमेटो उत्पादकांनी पाकिस्तानला टॉमेटो न देण्याचा निर्णय घेतला आहे.