J&K Governor Satya Pal Malik (Photo Credits: Twitter)

14 फेब्रुवारी 2019 दिवशी पुलवामा (Pulwama) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर सतत धुमसत आहे. भारतीय जवानांनी सर्च ऑपरेशन करून तीन दहशतवाद्यांना ठार केले असले तरीही सरकारकडून सतर्कता पाळली जात आहे. जम्मू काश्मीर मध्ये सध्या दहा हजार अतिरिक्त सुरक्षादलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अनेक जवानांच्या सुट्ट्या रद्द करून जम्मू काश्मीर मधील काही गाव रिकामी केली जात आहे. यावरून सध्या भारत पाकिस्तान विरुद्ध काही मोठी पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाना उधाण आलं होतं. मात्र जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik)  यांनी अतिरिक्त कुमक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तैनात केली असल्याची माहिती दिली आहे. जम्मू काश्मीर: फुटीरवादी नेत्यांनी जाहीर केला बंद; श्रीनगरमध्ये 14 वर्षांनंतर BSF च्या तुकड्या तैनात

जम्मू काश्मीर येथील राज भवनात सत्यपाल मलिक यांनी आज माहिती देताना सांगितले की, ' उद्या (25 फेब्रुवारी) दिवशी जम्मू काश्मीर मध्ये काही निवडणुका होणार आहेत. या निवडणुका मोकळ्यापणे व्हाव्यात याकरिता सुरक्षा वाढवण्यात आली आहे. देशात युद्धजन्य परिस्थिती नाही त्यामुळे जम्मू काश्मीरच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये अशी माहिती दिली आहे. सध्या

संविधानाच्या कलम 35-A वर  सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर फुटीरवादी नेत्यांनी आज बंदचे आवाहन केलं आहे. जम्मू काश्मीर मधील तणावपूर्ण वातावरण आहे.