शेती बिलाच्या (Farm Bill) विरोधात शेतकरी आणि सरकारमध्ये पुन्हा एकदा दिल्लीतील विज्ञान भवनात बैठक सुरु झाली आहे. या बैठकीपूर्वी पीएम मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी अमित शहा, राजनाथ सिंह आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यामध्ये चर्चा झाली. अशाच अशी अपेक्षा केली जात आहे की, कोणतीतरी उत्तम गोष्ट समोर येऊ शकते. बैठकीपूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यामुळे आता राजकरण तापले आहे. आठवले यांनी असे म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी गैरसमजपणे आंदोलन करणे योग्य नाही आहे. हा कायदा त्यांच्या हितासाठीच आहे.(कृषी कायद्याला विरोध करत शेतकर्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी Parkash Singh Badal, Sukhdev Singh Dhindsa परत करणार पद्म पुरस्कार)
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले की, हे आंदोलन गैरसमजातून करणे अयोग्य आहे. त्यांच्या हितासाठीच हा कायदा आहे. विरोधकांकडून जाणूनबुझून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार चर्चा करत असून कोणता तरी मार्ग मिळेलच. या बैठकीपूर्वी जोरदार विधाने ही केली गेली. विरोधकांकडून शेती कायद्याच्या विरोधासंबंधित केंद्रावर निशाणा ही साधला गेला.(Bharat Bandh: कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांकडून येत्या 8 डिसेंबरला भारत बंदची हाक)
किसानों का गलतफहमी में आंदोलन करना सही नहीं है, ये कानून किसानों के हित में हैं। जानबूझकर विपक्ष किसानों को भटका रहा है, सरकार बातचीत कर रही है और कोई न कोई मार्ग निकलेगाः केंद्रीय मंत्री रामदास आठवले #FarmersProtest pic.twitter.com/RYlHEj3Oid
— ANI_HindiNews (@AHindinews) December 5, 2020
दरम्यान या आधी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मुख्यात अब्बास नकवी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी असे म्हटले की, ज्यांचा शेतीसंबंधित काही नाही आणि शेतकऱ्यांच्या सावकारांबद्दल ते आज ज्ञान देत आहेत. काँग्रेसची समस्या आज पूर्णपणे वेंटिलेटरवर आहे. त्याचसोबत त्यांचे नेते आणि पप्पू जी यांचा मुर्खपणा एक्सीलेटवर चालत आहे.