Farmers Protest: कृषी कायदा वाद निवारणासाठी 4 सदस्यीय समिती नियुक्त; अशोक गुलाटी, अनिल धनवंत, बी. एस. मान, प्रमोद कुमार जोशी यांच्यावर प्रमुख जबाबदारी
Supreme Court On Farmers Act 2020 | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Farmers Protest: कृषी कायद्यांवरुन (Farmers Act 2020)

निर्माण झालेल्या केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी (Central Government vs Farmers) अशा वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एक समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. या समितीमध्ये कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी ( Ashok Gulati) भुपिंदर मान ( Bhupinder Singh Mann), प्रमोद जोशी (Dr. Pramod Kumar Joshi) आणि अनिल धनवट (Anil Ghanwat) या चौघांचा समावेश आहे. या समितीवर अनेक शेतकरी संघटना आणि नेत्यांनी टीका केली आहे. समितीतील व्यक्ती कोण आहेत? याविषयी थोडक्यात.

अनिल धनवट (Anil Ghanwat)

अनिल घनवट हे शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. अनिल घनवट हे अगदी शेतकरी संघटना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून शरद जोशी यांच्यासोबत राहिले. महाराष्ट्रात 2017 मध्ये युतीचे सरकार सत्तेत असताना झालेल्या शेतकरीआंदोलनावेळच्या सुनाणू समितीतही धनवट यांचा समावेश होता. ते खुल्या शेती व्यवस्थेचे समर्थक राहिले आहेत.

अशोक गुलाटी ( Ashok Gulati)

अशोक गुलाटी हे नाव प्रचिलित असे नाव आहे. देशातील नामवंत कृषी अर्थतज्ज्ञांपैकी एक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. याशिवाय कमिशन फॉर अग्रीकल्चरल कॉस्ट अँड प्रायसेस अर्थात सीएसीपीचे ते माजी अध्यक्ष राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या कृषीमाल (अन्नधान्य) दरात हमीभाव वाढवून देण्यात यावा यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. सध्या ते इंडियन काऊन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स (ICRIER ) येथे प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत. पंतप्रधानांच्या टास्क फोर्समध्येही त्यांचा समावेश आहे. त्यांच्या नावावर आतापर्यंत 13 पुस्तके आहेत. यातील बहुतांश पुस्तके ही शेती आणि कृषी अर्थशास्त्र आदी विषयांवर आहेत. (हेही वाचा, Farmers Protest: केंद्र सरकारला झटका, सुप्रीम कोर्टाकडून कृषी कायदा लागू करण्यासाठी स्थगिती)

भुपिंदर सिंग मान (Bhupinder Singh Mann)

भुपिंदर सिंह मान हे देशातील विविध शेतकरी संघटनांमध्ये जोरदार चर्चेत असते. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतातला म्हणजे आताच्या पाकिस्तानातील. सन 1939 मध्ये गुजरनवाला येथे जन्मलेले भुपिंदर सिंह मान हे फाळणीनंतर भारतात फैसलाबाद येथे आले. त्यांचे शिक्षण तेथेच झाले. त्यांनी 1966 मध्ये फार्मर फ्रेंड असोसिएशनची स्थापना केली. हळूहळू त्याचे रुपांतर भारत किसान युनियनमध्ये झाले. जी सध्या देशभर शेतीच्या प्रश्नांवर काम करते. त्यांच्या संघटनेने अनेकदा राजकीय भूमिका घेतल्या आहेत. 1967 मध्ये त्यांच्या संघटनेने जनसंघाला मदत केली. तसेच, 1975 च्या आणिबाणीला जोरदार विरोध केला. 1990 मध्ये ते राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार राहिले आहेत.

प्रमोद जोशी (Dr. Pramod Kumar Joshi)

प्रमोदकुमार जोशी हे सुद्धा कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत. सध्या ते साऊथ एशिया इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्सिट्यूटचे संचालक म्हणून काम पाहतात. या आधी त्यांनी नॅशनल अकॅडमी ऑफ अग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंटचं प्रमुख पदही भूषवलं आहे. तंत्रज्ञान, बाजार, संस्थात्मक अर्थशास्त्र या विषयात त्यांनी अभ्यास आणि संशोधन केेल आहे.