Farmers Protest: देशभरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये केंद्राच्या फार्म बिलाच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरु आहे. केंद्राच्या या बिलाच्या विरोधात आवाज उठवला जात असून ते आमच्या हितासाठी नसल्याचे वारंवार बोलले जात आहे. दिल्लीतील सिंघु बॉर्डवर (Singhu Border) मोठ्या प्रमाणात शीख समाजाच्या शेतकऱ्यांकडून फार्म बिलाच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. तसेच आज केंद्र सरकार सोबत शेतकऱ्यांच्या नेत्यांची बैठक ही बोलावण्यात आली होती. त्यात ही त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही बैठकीतून निघून जाऊ असे म्हटले आहे. याच पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अभिनेता-गायक दलजित दोसांज (Diljit Dosanjh) याने सुद्धा केंद्र सरकारला एक विनंती केली आहे.
दलजित दोसांज याने सिंघु बॉर्डवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनात संबोधित करताना असे म्हटले आहे की, आपण फक्त केंद्राला विनवणी करु शकतो. कृपा करुन आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. ते येथे शांतपणे बसले असून संपूर्ण देश शेतकऱ्यांसोबत आहे. पुढे दलजित याने शेतकऱ्यांना सलाम केला असून त्यांनी एक नवा इतिहास रचल्याचे ही म्हटले आहे. हा इतिहास भावी पिढ्यांना सांगितला जाईल. शेतकऱ्यांचे प्रश्न अन्य कोणाकडे वळवू नयेत असे ही दलजित दोसांज याने म्हटले आहे.(Farmers Protest: Sikhs For Justice संघटनेकडून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 10 लाख डॉलर्सची मदत जाहीर; एजन्सी झाल्या सतर्क)
Hats off to all of you, farmers have created a new history. This history would be narrated to future generations. Farmers' issues shouldn't be diverted by anyone: Singer-Actor Diljit Dosanjh addressing protesting farmers at Singhu border https://t.co/NrXfCAyBdI pic.twitter.com/u8w7v5w2r9
— ANI (@ANI) December 5, 2020
येत्या 8 डिसेंबरला शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी आपला रोष अधिक तीव्र केला आहे. तर शेतकऱ्यांना कॉर्पोरेट फार्मिंग मंजूर नाही आहे. आम्ही अंतिम वेळ देत नाही आहोत. पण आम्ही सरकारला सांगत आहोत की अशीच स्थिती राहिली तर प्रत्येक राज्यातून आणि जिल्ह्यातून दिल्लीत येऊ. आम्ही विश्वास ठेवत नाही पण लोकांच्या मनात सरकारच्या विरोधात अत्यंत संपात असल्याचे ही शेतकऱ्यांच्या नेत्यांने म्हटले आहे. कर्नाटकात 7 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत विधानसभेच्या बाहेर शेतकऱ्यांकडून धरणे आंदोलन केले जाणार आहे. बंगाल मध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.