Chakka Jaam (Photo Credits-ANI)

Farmers Protest: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी चक्का जामचे आव्हान केले आहे, हा चक्का दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. चक्का जाम मध्ये कोणत्याही पद्धतीचा हिंसा होऊ नये म्हणून पोलिसांकडून कठोर सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तर संयुक्त किसान मोर्चाचे बलबीर सिंह राजेवाल आणि राकेश टिकौत यांनी असे म्हटले आहे की, आज होणाऱ्या चक्का जाम मध्ये युपी आणि उत्तराखंड सोडून संपूर्ण देशात होणार आहे. या दोन्ही नेत्यांनी असे ही म्हटले की, युपी- उत्तराखंडात चक्का जाम नसणार आहे. येथे शेतकरी फक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. दिल्ली एनसीआर मध्ये सुद्धा चक्का जाम नसणार आहे. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या चक्का जामच्या आव्हानाला आपले समर्थन दिले आहे.

चक्का जामसाठी संयुक्त किसान मोर्चाकडून काही मार्गदर्शक सुचना ही जाहिर केल्या आहेत. त्यानुसार देशात, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत चक्का जाम असणार आहे. परंतु आपत्कालीन आणि आवश्यक सेवांना या दरम्यान रोखले जाणार नाही आहे. हा चक्का शांतीपूर्ण पद्धतीने पार पाडला जाणार आहे. तसेच आंदोलक कोणत्याही अधिकारी, कर्मचारी किंवा सामान्य नागरिकांसोबत वाद घालणार नाही आहेत. त्याचसोबत दुपारी 2 वाजून 1 मिनिटांनी हॉर्न वाजवून शेतकऱ्यांच्या एकतेचा संदेश देत चक्का जाम संपणार आहे.(Farmers Protest: शेतकरी आंदोलनावर UN Human Rights चे ट्विट, म्हटले 'अधिकाधिक संयम बाळगावा')

Tweet:

आंदोलक शेतकऱ्यांनी जरी चक्का जाम मधून दिल्लीला बाहेर ठेवल्याची घोषणा केली आहे. पण 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर पोलीस पूर्णपणे परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांना संसद भवन, इंडिया गेट सारख्या महत्वाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेबद्दल निर्देशन दिले आहेत.