उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani ) यांच्या नुकत्याच जन्मलेल्या नातवाला पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रुग्णालयात पोहोचल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोसोबत एक कॅप्शनही पाहायला मिळते. ज्यात म्हटले आहे की, दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास भेट द्यायला पंतप्रधानांकडे वेळ आहे. परंतू, उद्योगपती अंबानीच्या नातवाला पाहण्यासाठी पंतप्रधानांकडे भरपूर वेळ आहे. उद्योगपती मुकेश आणि त्यांच्या पत्नी निता अंबानी नुकतेच आजोबा-आजी झाले. त्यांचा मुलगा आकाश अंबानी यांच्या पत्नी श्लोका मेहता यांनी एका बाळाला नुकताच जन्म दिला. त्यालाच भेटायला पंतप्रधान गेल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. परंतू, हा फोटो दिशाभूल करणारा असून, या फोटोचा आणि उल्लेखीत घटनेचा काहीही संबंध नसल्याचे पुढे आले आहे. हा फोटो आणि त्याबाबतची ही सत्यपडताळणी. (Fact-Check about Fake News of PM Narendra)
कसा आहे फोटो आणि काय होतोय दावा?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो आणि त्यासोबत करण्यात येणारा दावा दोन्ही दिशाभूल करणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी एका रुग्णालयात उभ्या असल्याचे फोटोत पाहायला मिळते आहे. हाच दाखला घेत दावा करण्यात येतो आहे की, दिल्लीच्या सीमेवर अन्नदाता आंदोलन करत आहे. त्याला भेटायला पंतप्रधानांकडे वेळ नाही. परंतू, अंपानी यांच्या नातवाला रुग्णालयात जाऊन भेटण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ आहे. संबंधित फोटो आणि त्यासोबतचा दावा ट्विटर आणि फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन केला जात आहे. (हेही वाचा, Fact Check: RBI ने 2000 रुपयांच्या नोटांचा पुरवठा बंद केल्याने ATM मध्ये केवळ 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा उपलब्ध? काय आहे सत्य? जाणून घ्या)
काय आहे सत्य?
दरम्यान, व्हायरल फोटोमागचे सत्य असे की हा फोटो खरा असला तरी सन 2020 मधील नाही. हा फोटोच मुळात 2014 मधील आहे. त्यामुळे सहाजिकच फोटोसोबत केल्या जाणाऱ्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही हे स्पष्ट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2014 मध्ये मुंबई येथे एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता. या वेळी हॉस्पीटलचे कर्मचारी उपस्थीत होते. तसेच, मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी आणि पीएम मोदी यांनाही आपण या फोटोत पाहू शकता.