भारत सरकार कडून 59 चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता टिकटॉक (TikTok) कडून कायदेशीर मार्ग तपासले जात आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांना भारतामध्ये झटका लागला आहे. दरम्यान टिकटॉक कडून भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी संपर्क करण्यात आला होता, मात्र त्यांनी चीनी अॅपसाठी भारत सरकार विरूद्ध उभं राहण्यास नकार कळवला आहे. अशी माहिती ANI च्या ट्वीट मधून समोर आली आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षेला बाधा असल्याचं सांगण्यात सरकारने काही अॅप्सवर बंदी घातली आहे. India Bans Chinese Mobile Apps: भारत सरकारने घातली TikTok, UC Browser, Shareit सह 59 चिनी मोबाइल अॅप्सवर बंदी; जाणून घ्या संपूर्ण यादी.
दरम्यान टिकटॉक कडून बंदीचा आदेश येताच युजर्सना त्यांचा डाटा सुरक्षित असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. टिक टॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी एक पत्रक जारी करत सरकारशी बोलणी सुरू असल्याचं म्हटलं होतं. TikTok Goes Completely Offline in India: भारतातील वापरकरर्त्यांना टीक-टॉकवर व्हिडिओ पाहणे किंवा अपलोड करणे झाले बंद!
ANI Tweet
Mukul Rohatgi, former Attorney General of India, refuses to appear for Tik Tok, says he won't appear for the Chinese app against the Government of India. (file pic) pic.twitter.com/Pds2ZuUDii
— ANI (@ANI) July 1, 2020
मागील काही दिवसांपासून भारत-चीन संबंध ताणलेले आहेत. गलवान खोर्यातही भारतीय सैन्यावर हिंसक झडप झाली. या पार्श्वभूमीवर आता सरकार कडून टिकटॉक, शेअर ईट, हेलो सारख्या सुमारे59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच काही दिवसांपूर्वी चीन कडून सायबर हल्ला होण्याची भीती देखील वर्तवण्यात आली आहे.
काल पासून टिकटॉक सह बंदी घालण्यात आलेली अॅप्स ही बंद झाली आहेत. तर भारतामध्ये अॅपल प्ले स्टोअर आणि गूगल प्ले स्टोअर मधून देखील टिकटॉक गायब झाले आहे.