ईव्हीएम मशीन स्थलांतराबद्दल व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण
Election Commission of India | File Image | (Photo Credits: PTI)

देशात लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections)  मतदान पार पडले. परंतु सध्या सोशल मीडियात काही व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यामध्ये ईव्हीएम मशीनचे (EVM Machine) स्थलांतर केले जात असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारावर केंद्रीय निवडणुक आयोगाने (Election Commission) पत्रकार परिषद घेत याचे स्पष्टीकरण दिले आहे.

पत्रकार परिषदेत निवडणुक आयोगाने असे म्हटले आहे की, मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन काळजीपूर्वक उमेदवारांच्या समोरच सील बंद करण्यात आल्या होत्या. त्याबद्दलचे शूटिंग सुद्धा करण्यात आले होते. त्यामुळे सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असलेले व्हिडिओ खोटे असल्याचे स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे.(लोकसभा निवडणूकीचे निकाल लागण्यापूर्वीच मतांमध्ये फेरफार? खासगी वाहने आणि दुकानांमध्ये ईव्हीएम सापडल्याने वाद Video)

तत्पूर्वी ईव्हीएम बद्दल करण्यात आलेल्या छेडछाडीच्या व्हिडिओमुळे विरोधी पक्षनेत्यांनी निवडणुक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंगरुममध्ये सुरक्षित असून तेथे रात्रंदिवस सीआरपीएफचे जवान तैनात असल्याचे आयोगाने म्हटले आहे.