Shashi Ruia With PM Modi (फोटो सौजन्य - X/@narendramodi)

Shashi Ruia Passes Away: एस्सार समूहाचे सह-संस्थापक (Essar Group Co-Founder) शशी रुईया (Shashi Ruia) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. 25 नोव्हेंबर रोजी रात्री 11.55 वाजता मुंबईत रुईया यांनी अखेरचा श्वास घेतला. पीटीआयच्या वृत्तानुसार, सुमारे एक महिन्यापूर्वी ते अमेरिकेतून उपचारासाठी परतले होते. मंगळवारी दुपारी 1 ते 3 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी रुईया हाऊस येथे ठेवण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता रुईया हाऊस येथून हिंदू वरळी स्मशानभूमीसाठी अंत्ययात्रा निघेल.

शशी रुईया यांच्या पश्चात पत्नी मंजू आणि दोन मुले प्रशांत आणि अंशुमन असा परिवार आहे. रुईया यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून ते उद्योग क्षेत्रातील एक महान व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. 'त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि उत्कृष्टतेची अटळ बांधिलकी यामुळे भारताच्या व्यवसायाचे परिदृश्य बदलले. त्यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांनी नावीन्य आणि विकासासाठी उच्च मापदंड स्थापित केले. त्याच्याकडे नेहमी अनेक कल्पना होत्या. आपण आपला देश कसा चांगला बनवू शकतो यावर ते नेहमी चर्चा करायचे,' असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शोक संदेशात नमूद केलं आहे. (हेही वाचा -Neena Kulkarni Death Rumours: अभिनेत्री निना कुळकर्णी यांच्या निधनाच्या चर्चा केवळ अफवा, बातम्याही निराधार)

शशी रुईया यांच्या निधनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक - 

एस्सार समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचे निधन -

शशी रुईया यांनी त्यांचा भाऊ रविकांत रुईया (उर्फ रवि रुईया) सोबत 1969 मध्ये एस्सार ग्रुप या धातूपासून तंत्रज्ञानापर्यंतच्या व्यवसायात गुंतलेली कंपनी स्थापन केली होती. शशिकांत रुईया यांनी 1965 मध्ये त्यांचे वडील नंद किशोर रुईया यांच्या मार्गदर्शनाखाली कारकिर्दीला सुरुवात केली आणि चेन्नई बंदरात बाह्य ब्रेकवॉटर बांधून 1969 मध्ये एस्सारचा पाया घातला. एस्सार समूह आज पोलाद, तेल शुद्धीकरण, उत्खनन आणि उत्पादन, दूरसंचार, ऊर्जा आणि बांधकाम यासह अनेक क्षेत्रात व्यवसाय करतो.