
ज्येष्ठ अभिनेत्री निना कुळकर्णी (Neena Kulkarni) यांच्या निधनाच्या अफवा (Death Rumors) सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या सर्व अफवा आणि वृत्तांचे अभिनेत्रीने खंडण केले असून, आपण धडधाकट असल्याचे म्हटले आहे. 69 वर्षीय अभिनेत्रीने स्पष्ट केले की, 'युट्युबवर माझ्या निधनाचे दिशाभूल करणारे आणि चुकीचे वृत्त दाखवले जात आहे. ईश्वरकृपेने मी जीवंत असून, माझी प्रकृतीही ठणठणी आहे. सध्या मी माझ्या कामामध्ये व्यग्र आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही अभवांकडे लक्ष देऊ नका, त्यावर विश्वास ठेऊ नका. मला दीर्घायुष्य मिळावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना.' शेवरी, गंध, गेम ऑफ थ्रोन्स, आधारस्तंब यांसारख्या प्रसिद्ध मराठी आणि कुछ तुम कहो, कुछ हम कहे, मेरे यार की शादी है, मिर्च मसाला यांसासारख्या हिंदी चित्रपट आणि 'ये है मोहब्बतें' (Yeh Hai Mohabbatein) सारख्या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकांमधून निना कुळकर्णी यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या.
भारतीय मनोरंजनविश्वातील महत्त्वाचा चेहरा
अभिनेत्री निना कुळकर्णी हिंदी आणि मराठी चित्रपट, तसेच दूरचित्रवाणी आणि रंगभूमी यांसह मनोरंजन उद्योगात सक्रियपणे काम करत आहे. ती 'कम्मल', 'एक पैकेट उम्मीद' आणि 'देवयानी' सारख्या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवताना दिसल्या आहेत. अलीकडेच, त्यांनी परेश रावलसोबत 2023 मध्ये आलेल्या शास्त्री विरुद्ध शास्त्री या चित्रपटात काम केले आणि अनुपम खेर यांच्या नेतृत्वाखालील 'द सिग्नेचर "या चित्रपटातही त्या पाहायला मिळाल्या.
निना कुळकर्णी यांचे गाजलले चित्रपट आणि भूमिका
शेवरी (विद्या बर्वे), हसी तो फसी (हिंदी चित्रपट), गंध (मराठी), गेम ऑफ थ्रोन्स (मराठी) (कॅटलिन स्टार्क), शर्यत (मराठी) (गायत्री), अनुमती (मराठी), आधारस्तंभ (मराठी), मोगरा फुलला (मराठी), येस आय कॅन (मराठी), सवत माझी लाडकी (मराठी), नायक (हिंदी), कुछ तुम कहो, कुछ हम कहे (हिंदी), मेरे यार की शादी है (हिंदी), मिर्च मसाला (हिंदी),सातच्या आत घरात (मराठी), सरींवर सरी (मराठी), पछाडलेला (मराठी), उत्तरायण (मराठी), ढाई अक्षर प्रेम के (हिंदी), भूतनाथ (हिंदी).
नीना कुळकर्णी यांची नाटके/मालिका
महासागर, एज्युकेटिंग रिटा, ध्यानीमनी, छापा-काटा, हमिदाबाईची कोठी, वाडा चिरेबंदी
रंगमंचावरील नाटकांपासून रुपेरी पडद्यापर्यंतच्या अनेक मंचांवर कुळकर्णी यांनी आपल्या कामाने विस्तार केला आहे. ज्यामुळे तिच्या कलेसाठी समर्पित असलेली एक अष्टपैलू कलाकार म्हणून त्या अतिशय प्रसिद्ध झाल्या.