EPFO ग्राहकांसाठी दिलासा, UAN-आधार लिंक करण्याच्या तारखेत 31 डिसेंबर पर्यंत वाढ
EPFO (Photo Credits-Facebook)

कर्मचारी भविष्य निधी संगठन (EPFO) ने EPF खात्याला आधार लिंक करण्याप्रकरणी EPFO ग्राहकांना दिलासा दिला आहे. लिंक करण्याची अंतिम तारीख वाढवून ती आता 31 डिसेंबर 2021 करण्यात आली आहे. यापूर्वी अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट होती. EPFO ने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे.(Swiss Bank On Black Money: स्वीस बँक भारताला देणार 'काळा पैसा' खातेधारकांची माहिती)

जर तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत EPFO आणि आधार क्रमांक लिंक केले नसल्यास तुमच्याकडून देण्यात येणारे योगदान थांबवले जाणार आहे. या व्यतिरिक्त EPF अकाउंट मधून पैसे काढताना सुद्धा समस्या येऊ शकतात. जर EPF अकाउंट होल्डर आधार सोबत लिंक नसेल तर त्यांना EPFO च्या सर्विसचा वापर करता येणार नाही आहे.(PF Balance: पीएफ अकाऊंट बॅलन्स SMS, Missed Call, Umang App आणि EPFO Portal द्वारे कसा चेक कराल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)

Tweet:

EPF खात्यात कर्मचारी आणि नियोक्तो सुद्धा पैसे टाकतात. EPFO अॅक्ट अंतर्गत कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी अधिक DA चा 12 टक्के EPF खात्यात जमा होतात. तर कंपनी सुद्धा बेसिक सॅलरी प्लस डीए 12 टक्के योगदान देते. कंपनीच्या 12 टक्के योगदानामधील 3.67 टक्के कर्मचाऱ्याच्या पीएफ अकाउंट मध्ये जातो आणि उर्वरित 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत जातात. EPF खात्यावर वर्षाला 8.50 टक्के व्याज दिले जाते.