मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांच्या पत्नी स्वप्नाली भोसले (Swapnali kadam) यांना अंमलबजाणी संचालनालयाने (Enforcement Directorate) नोटीस पाटवल्याचे वृत्त आहे. या वृत्ताची पुष्ठी होऊ शकली नाही मात्र प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, विश्वजीत कदम यांनी या नोटीशीबाबात आपल्याला काही कल्पना नाही. माहिती घेऊन याबाबत बोलू असे कदम यांनी म्हटले.
टीव्ही नईन मराठी या वृत्तवाहीनीने दिलेल्या वृत्तानुसार, स्वप्नाली भोसले कदम यांना ईडी कार्यालयात आज हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. स्वप्नाली यांचे वडील अविनाश भोसले हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांची मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात स्वप्नाली यांची चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, स्वप्नाली या आज सकाळी 11.30 वाजता ईडी कार्यालात जाणार असल्येचे बोलले जात होते. परंतू, त्या ईडी कार्यालयात हजर राहिल्या किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.
काय आहे प्रकरण?
अविनाश भोसले यांच्या मालमत्तेबाबत ईडी चौकशी करत आहे. या आधी 27 नोव्हेंबर 2020 या दिवशी ईडीने भोसले यांची जवळपास 10 तास चौकशी केल्याचे सांगण्यात आले होते. फेमा (FEMA) कायद्यांद्यांतर्गत ही चौकशी केली गेली असे त्यावेळी सांगिण्यात आले. हे प्रकरण अद्यापकही कायम आहे. आयकर विभागानेही भोसले यांच्या कार्यालयावर छापेमारी केली होती. आयकर विभागाने भौसले यांच्या पुणे आणि मुंबई येथील सुमारे 23 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले होते.
दरम्यान, ईडी आणि आयकर विभागाने या आधी महाविकासाआघाडी सरकारमधील अनेक मंत्री आणि नेत्यांना त्यांच्या कुटुंबीय आणि संबंधितांना नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली होती. याशिवाय शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनाही ईडीने नोटीस पाठवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही अनेक नेत्यांना नोटीस पाठवून चौकशीला बोलावण्यात आले होते.