कातळशिल्प । Representative Images | PC: Wikipedia

Geoglyphs In Dapoli and Mandangad: रत्नागिरीच्या (Ratnagiri) दापोली (Dapoli) मधील उबर्ले (Ubarle) गावात काही कातळशिल्प आढळली आहेत. या कातळ शिल्पांवर एलियन सदृश्य प्रतिमा असल्याने अनेकांचं कुतुहल वाढलं आहे. अभ्यासकांच्या दाव्यांनुसार ही कातळशिल्प सुमारे 10 हजार वर्षांपूर्वीची आहेत. अशाप्रकारची कातळशिल्प आसपास अन्यत्र कुठेही नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 'गाढवाचा खडक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंबर्ले गावामध्ये ही कातळशिल्प जांभ्या सड्यावर आढळली आहेत. यामध्ये 6 कातळशिल्पांचा समावेश आहे. मानवासह तीन हरीण आणि 2 बैल देखील आढळली आहेत. सात पैकी एक कातळ शिल्प सुमारे 17 फीट लांबीचं आहे. तर मंडणगडमधील (Mandangad) बोरखत गावामध्येही एक कातळशिल्प आढळलं आहे.

कोकणामध्ये यापूर्वी राजापूर, रत्नागिरी, लांजा या पट्ट्यात कातळशिल्प आढळली आहेत. कोकणात विविध भागात सुमारे 1500 पेक्षा अधिक कातळशिल्प आहेत. पण तशीच कातळशिल्प दापोली आणि मंडणगड मध्येही आढळली असल्याने त्याबद्दल कुतुहल अधिक वाढलं आहे. संशोधकांनी देखील ही कातळशिल्प खास असल्याचं सांगत त्याबद्दल अधिक अभ्यासाची गरज असल्याचं म्हटलं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, डॉ. अजय धनावडे दापोलीत सापडलेल्या कातळशिल्पांच्या या ठिकाणी भेट देत आहे. सध्या त्यांची मोजमापे, छायाचित्र घेत अभ्यास सुरू केला आहे. (हेही वाचा, Konkan Refinery: कोकणातील रिफायनरी बारसू सोलगावात होणार, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडून हिरवा कंदिल).

कोकणातील कातळशिल्पं ही अश्मयुगीन काळातील असून ती मध्यअश्मयुगीन असून सुमारे 10 ते 3 हजार वर्षे जुनी असण्याची शक्यता मानली जात आहे. कातळशिल्पांचे सरकारकडून जतन व्हावे, कातळशिल्पे पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढणार असल्याने, या शिल्पांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया अभ्यासक डॉ. अजय धनावडे यांनी दिली आहे.