हिरे कर्मचाऱ्यांना आर्थिक मंदीचा फटका, सावजी ढोलकिया यांच्याकडून दिवाळी गिफ्ट म्हणून देण्यात येणारे फ्लॅट आणि कार मिळणार नाही
सावजी ढोलकिया (Photo Credits-Twitter)

देशात सध्या सुरु असलेल्या आर्थिक मंदीचा (Economy Slowdown) फटका आता गुजरात (Gujrat) मधील हिरो व्यापारी यांच्यावर सुद्धा होणार आहे. त्यामुळे आता सुरत (Surat) मधील हिरे कर्मचाऱ्यांना येत्या दिवाळीत सावजी ढोलकिया (Savji Dholakia) यांच्याकडून देण्यात येणारे दिवाळी गिफ्ट मिळणार नाही आहे. परंतु आतापर्यंत प्रत्येक दिवाळीला हिरे कर्मचाऱ्यांना ढोलकिया यांच्याकडून कार, ज्वेलरी किंवा फ्लॅट दिले जात होते. मात्र यंदा आर्थिक मंदीचा फटका ढोलकिया यांना सुद्धा बसला असून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

सावजी ढोलकिया यांनी असे म्हटले की, 2008 मध्ये आलेल्या भीषण मंदीपेक्षा आताच्या मंदीत हिरे व्यापारात खुप नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या गिफ्टचा खर्च कसा करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचसोबत हिरे कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत अधिक चिंता ढोलकिया यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या 7 महिन्यात 40 हजार पेक्षा अधिक लोकांना त्यांच्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. त्याचसोबत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 40 टक्के कपात करण्यात आली आहे.

सुरत मधील डायमंड किंग सावजी भाई ढोलकिया यांच्या हरे कृष्णा हायमंड एक्सपोर्ट कंपनीत जवळजवळ 8 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कंपनीचे वार्षिक टर्नओवर 6 हजार करोड रुपये आहे. ढोलकिया यांनी 2011 मध्ये प्रथमच 1200 कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅट आणि ज्वेलरी गिफ्ट दिल्यामुळे चर्चेत आले होते. तेव्हापासून ढोलकिया त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देत आहेत.(कुणी नोकरी देतं का नोकरी? आर्थिक मंदी नोकरीच्या मुळावर; Automobile सेक्टरसह अनेक क्षेत्रात नोकरभरती मंदावली)

तसेच आर्थिक मंदीच्या काळात कंपन्यांना त्यांचेच काम कमी करावे लागत आहे. असे पहिल्यांदाच झाले आहे की, हिरे व्यापारामधील दिग्गज कंपनी De Beers Sa यांना त्यांचे उत्पादनात घट करावी लागली आहे.