Earthquake In North India राजधानी दिल्ली-एनसीआर (Delhi NCR) आणि उत्तर भारत (Northern India:) भूकंपाच्या धक्यांनी शुक्रवारी (20 डिसेंबर 2019) हादरला. रिष्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 6.8 इतक्या तिव्रतेची नोंद झाली आहे. दिल्ली, नोएडा, एनसीआर, गाझीयाबाद (Ghaziabad), बिहार ( Bihar) , गोरखपूर, उत्तर भारत, जम्मू कश्मीर (Jammu and Kashmir) , पाकिस्तान, पाकव्याप्त कश्मीर (Pak-occupied Kashmir ) आदी ठिकाणी भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत.
भूकंपाबाबत हातील आलेल्या माहितीनुसार, गुरुग्राम येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच परिसारीतील इमारतींमधील रहिासी बाहेर पडले. काही इमारतींमध्ये सुरक्षा आलार्मही वाजला. भूकांपाबाबत माहिती देताना स्थानिकांनी सांगितले की साधारण 50 सेंकंद भूकंपाचे धक्के जाणवले.
दरम्यान, पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र अफगानिस्तान येथील हिंदकुश येथे आहे. हिंदूकुश येथील भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर 6.8 इतकी झाली.
एएनआय ट्विट
Earthquake tremors felt in Delhi NCR pic.twitter.com/JEy0hK6RBa
— ANI (@ANI) December 20, 2019
राजधानी दिल्ली-एनसीआर आणि अवघा उत्तर भारत मोठ्या भूकंपाने हादरला आहे. रिष्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 6.8 इतक्या तिव्रतेची नोंद झाली आहे. दिल्ली, नोएडा, एनसीआर, गाझीयाबाद, बिहार, गोरखपूर, उत्तर भारत, जम्मू कश्मीर, पाकिस्तान, पाकव्याप्त कश्मीर आदी ठिकाणी भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत.