Earthquake In Haryana: राजधानी दिल्ली-एनसीआर, हरियाणा (Haryana), पंजाब राज्यांसह देशातील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता 4.6 इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू हा हरियाणा राज्यातील रोहतक येथे होता. या आधी 15 मे रोजी दिल्ली येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या वेळी भूकंपाचा केंद्र बिंदू पीतमपुरा परिसरात होता. त्या भूकंपाची तीव्रता 2.2 इतकी होती. दरम्यान 15 मे पूर्वीही 10 मे रोजी दिल्ली येथे 3.4 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता.
गेल्या काही काळापासून दिल्ली आणि परिसरात भूकंपाच्या घटना वारंवार घडत आहेत. भूवैज्ञानिकांनी दिल्ली आणि परिसरातील अनेक ठिकाणांना झोन 4 म्हणून संबोधले आहे.
एएनआय ट्विट
An earthquake with a magnitude of 4.6 on the Richter Scale hit 16 km ESE of Rohtak in Haryana at 21:08 hours today: National Center for Seismology (NCS) https://t.co/KxCMw8I680
— ANI (@ANI) May 29, 2020
दरम्यान, भूकंप आला तरी घाबरण्याचे मुळीच कारण नाही. नागरिकांना भूकंप काळात राहते घर, बिल्डींग आदी ठिकाणांतून बाहेर यायला हवे मोकळ्या परीसरात आश्रय घ्यावा. जर घरात असाल तर चौकट, अथवा बेड, टेबल आदीच्या खाली थांबण्याचा प्रयत्न करा. भूकंप काळात लिफ्टचा मुळीच वापर करु नये. अशा काळी जीना वापरणेच योग्य असते.