उद्या 6 डिसेंबर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. संपूर्ण देशासाठी एक महत्त्वपूर्ण दिवस. त्यामुळे देश आणि जगभरातून डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले जाईल. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसद भवनात असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. तसेच, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह अनके मान्यवरही डॉ. आंबेडकराना श्रद्धांजली अर्पण करतील.दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत, राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री कृष्ण पाल गुर्जर, विजय सांपल आणि इतरही अनेक मान्यवर लोक या वेळी उपस्थित राहतील.
दरम्यान, याकार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशनद्वारा करण्यात येणार आहे. संसद भवनात पुष्पहार अर्पण करण्याचा हा कार्यक्रम सकाळी 9.30 ते 11.00 वाजणेच्या काळात केला जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांना कार्यक्रम कालात कोणत्याही प्रकारची बॅग, ब्रीफकेस, पॉकेट, सेलफोन, पेन, कॅमेरा, झेंडा, प्ले कार्ड, मार्शल, बॅनर, तलवार, अग्निजन्य पदार्थ, तलवार किंवा आपत्तीजनक, आक्षेपार्ह वस्तू आणता येणार नाही. (हेही वाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेष मेसेज, Whats App स्टेट्स)
ज्या मान्यवरांना या कार्यक्रमास उपस्थित राहायचे आहे आणि त्यांच्याकडे वरीलपैकी काही वस्तू असतील तर, हे मान्यवर या वस्तू पीटीआय भवनच्या परिसरात उभारण्यात आलेल्या स्टॉलवर जमा करु शकतात. मान्यवर पीटीआय भवन, संसद मार्ग, नवी दिल्लीच्या विरुद्ध मार्गाने प्रवेश करु शकतात. उल्लेखनिय असे की, 6 डिसेंबर 1956 रोजी संविधानाची निर्मिती झाली होती.