
दिल्लीतल्या एका गावात विहिर पूजनाच्या वेळी डीजेवाल्याला गाणे लावायला सांगितल्याने त्याने दोन तरुणांवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे दोघे तरुण गंभीर जखमी झाले असून एकाची किडनी काढण्यात आली आहे.
पालम गाव येथे विहिरीचे पूजन ठेवण्यात आले होते. त्यावेळी रात्री डीजेचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गल्लीतल्या दोन तरुणांनी डीजे आयोजित केलेल्या ठिकाणी जाऊन गाणे लावण्यास सांगितले. परंतु अचानक संतप्त झालेल्या डीजेच्या मालकाने त्या दोघांना बंदूकीचा धाक दाखवत त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी आोरपीला अटक करण्यात आली आहे. तर गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाची किडनी काढण्यात आली असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.