कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब वादादरम्यान, गुरुवारी मद्रास हायकोर्टाने देशातील काही जणांकडून धार्मिक तिरस्कार निर्माण करण्यावर चिंता व्यक्त करत नाराजी व्यक्त केल आहे. हायकोर्टाने असे म्हटले की, राष्ट्र की धर्म, सर्वोपरि आहे. कर्नाटकात हिजाब संबंधित वादावरील एका याचिकेवर सुनावणी करताना कार्यवाहक मुख्य न्यायाधीश एमएन भंडारी आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्त यांच्या खंडपीठाने म्हटले की, काही जणांनी ड्रेस कोडवरुन वाद निर्माण केला आहे. याचा परिणाम संपूर्ण देशावर पडत आहे. पीठाने असे ही म्हटले की, हे खरंच हैराण करणारी गोश्ट असून काही जण हिजाबच्या बाजूने आहेत तर काही धोती किंवा टोपीच्या बाजूने आणि अन्य दुसऱ्याच गोष्टीच्या बाजूने आहेत.
हिंदू नसलेल्यांना मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रवेश नकारणाऱ्यासाठी हिंदू मंदिरात फक्त सनातन धर्मातील विश्वासकर्त्यांना परवानी देण्याच्या आदेशाची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी करत हायकोर्टाने म्हटले की, सर्वोपरि काय आहे? देश की धर्म? तसेच हे हैराण करणारे आहे की, काही जण हिजाबच्या मागे जातायत तर काही जण धोतीच्या मागे. मुख्य न्यायाधीश मुनीश्वर नाथ भंडारी आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने श्रीरंगमच्या रंगराजन नरसिम्हन यांच्याकडून हिंदू मंदिरात प्रवेश बंदीच्या मागणीवरील याचिकेवर ही टिप्पणी केली आहे.(Hijab Row: निर्णय येईपर्यंत शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक वस्त्रे परिधान करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाची स्थगिती)
याचिकाकर्त्याने भाविकांना सक्तीने ड्रेस कोड लागू करणे, नॉन- हिंदूंना राज्यभरातील मंदिरात प्रवेश न देणे आणि मंदिर परिसरात व्यावसायिक गोष्टींवर ही बंदी घालण्याची मागणी केली आहे. याचिकेत असे म्हटले आहे की, मंदिराच्या प्रवेश द्वारावरच ड्रेस कोड आणि नॉन-हिंदूंना प्रवेश दिला जाणार नसल्याचा बोर्ड लावला पाहिजे.