कर्नाटक: धारवाड येथे इमारत कोसळून 13 ठार, मातिच्या ढिगाऱ्याखालून नागरिकांची मदतीसाठी याचना
Dharwad building collapse | (Photo Credits: Twitter/ANI)

Karnataka Dharwad Building Collapse: कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यात इमारत कोसळून तब्बल 13 लोकांचे प्राण गेले. ही इमारत बांधकाम सुरु असताना तीन दिवसांपूर्वी कोसळली आहे. अद्यापही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. बचाव पथकाने मातिच्या ढिगाऱ्याखालून 3 मृतदेह गुरुवारी काढले होते. तसेच, 56 रहिवाशांचे प्राण वाचवले. अद्यापही या घटनेतील पीडित असलेलेल 12 लोक बेपत्ता आहेत. बचावकार्य सुरु असून मातीचा ढिगारा बाजूला करण्याचा काम सुरु आहे. मातीच्या ढीगाऱ्याखालून अद्यापही नागरिक मदतीसाठी याचना करत असल्याचे आवाज येत आहेत. ही घटना 19 मार्च रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या उनाकल (8), दक्षायिणी (45) आणि आणखी एका व्यक्तिचा मृतदेह घटना घडल्याच्या तिसऱ्या दिवशी कोसळलेल्या इमारतीच्या मातीच्या ढिगाऱ्याखालून काढला. अद्यापही जवळपास 12 ते 15 लोक मातिच्या ढिगाऱ्याखाली अडकले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही इमारत चार मजली होती. तसेच, या इमारतीची मालकी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय कुलकर्णी यांच्या नातेवाईकाकडे असल्याचे सांगितले जात आहे. ही इमारत मंगळवारी (19 मार्च) कोसळली. यात 56 लोक जखमी झाले होते.

काँग्रेस नेते विनय कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, इमारतीच्या भागधारकांपैकी एक जण हा माझा नातेवाईक आहे. तरीही इमारत कोसळण्यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले अधिक लोक हे उत्तर भारतीय कामगार आहेत. हे कामगार या इमारतीत टाईल्स लावण्याचे काम करत होते. (हेही वाचा, हरयाणा: गुरुग्राम येथे 4 मजली इमारत कोसळली; काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले)

एएनआय ट्विट

मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी म्हटले की, इमारत कोसळल्याची बातमी येताच मी निशब्द झालो. पीडितांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात यावी. तसेच, इमारत कोसळण्यास जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.