हरयाणा: गुरुग्राम येथे 4 मजली इमारत कोसळली; काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले
Building Collapse in Ullawas, Gurugram (Photo Credits: ANI)

गुरुवारी सकाळी हरयाणातील (Haryana) गुरुग्राम (Gurugram) येथील उलावास (Ullawas) परिसरातील एक चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनतेत पाच लोक कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल च्या (National Disaster Response Force) तीन टीम (NDRF Team) घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचतकार्य सुरु करण्यात आले असून लोकाना ढिगाऱ्याबाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

या दुर्घटनेला कोण जबाबदार असेल, दुर्घटनेमागील कारण शोधण्यासाठी चौकशी सुरु करण्यात आली आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, "इमारतीचे काम सुरु असताना अचानक इमारत कोसळली." या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (गोरेगाव येथील अविकसित इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, 8 जण जखमी)

गेल्या दोन वर्षात दिल्ली आणि एनसीआरच्या परिसरात अशा प्रकारच्या घटना वाढीस लागल्या आहेत.