CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, शिवसेनेने भाजप सोबत जुळवून घ्यावे. एकूणच काय की शिवसेनेने भाजप बरोबर युती करावी. त्यांच्या या लेटरबॉम्बनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडवणीस यांनी असे म्हटले की, शिवसेना-भाजप पक्षाची युती व्हावी असे अनेकांना वाटत ही असेल.परंतु शिवसेनेने यावर काय उत्तर द्यावे हे पक्षप्रमुखांचा प्रश्न आहे. तसेच पुढे फडणवीस यांनी म्हटले की, आम्ही नागरिकांच्या समस्या मांडत आहोत. त्याचसोबत सक्षम विरोधी पक्ष म्हणून ही काम करतोय. पण याआधी आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होते मात्र बहुमत नव्हते. परंतु येत्या काळात निवडून येऊ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.(Pratap Sarnaik Letter to CM Uddhav Thackeray: अधिक तुटण्याआधी भाजपसोबत जुळवून घ्या, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र)

Tweet:

महाविकास आघाडीवर निशाणा साधत फडवणीस यांनी म्हटले की, भाजप पक्ष स्वबळावरच लढत आहे. त्यामुळे कोणी कोणाला जोड्याने मारायाचे किंवा हार घालायचे हे त्यांनी ठरवावे. ऐवढेच नाही कोणी कोणासोबत युती करावी हे सुद्धा आता त्यांनाच ठरवावे लागणार आहे.

दुसऱ्या बाजूला पियुष गोयल यांनी सुद्धा या प्रकरणी एक ट्विट केले आहे. गोयल यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, प्रताप सरनाईक यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नरेंद्र मोदी आणि भाजप सोबत हातमिळवणी करण्यास सांगावे.  सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रविंद्र वायकर यांच्या नावासाठी गोयल यांनी हॅशटॅग वापरुन हे लोक तुरुंगात जाणारे असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत त्यांनी ट्विटमध्ये अखेरीस, महाराष्ट्रातील भाजप पक्ष, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना टॅग सुद्धा केले आहे.

Tweet:

दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून शिवसेना कमकूवत करत आहेत असे पत्रात म्हटले आहे. हे पक्ष जर शिवसेना कमकुवत करत असतील तर त्यापेक्षा भाजपसोबत जुळवून घेतलेलं बरं. भाजप-शिवसेना युती झाली तर फायदाच होईल. प्रामुख्याने प्रताप सरनाईक, अनिल परब आणि रवींद्र वायकर यांसारख्यांना नाहक होणारा त्रास तरी वाचेल, असेही या पत्रात म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.