देवेंद्र फडणवीस यांच्या 49व्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदी यांनी दिल्या खास 'ट्वीट' च्या माध्यमातून शुभेच्छा!
Narendra Modi Wishesh Devendra Fadnavis On His Birthday (Photo Credits: PTI, Instagram)

Devendra Fadnavis 49th Birthday:  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)  यांचा आज, म्हणजेच 22 जुलै ला वाढदिवस आहे, यानिमित्त समाजमाध्यमातून राजकीय वर्तुळातील अनेक मंडळींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.हे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुद्धा फडणवीस यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून काही वेळापूर्वी एक खास ट्विट केले होते, ज्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, पुढे त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

"मागील पाच वर्षात महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी फडणवीस यांचे उत्साहपूर्ण काम हे एक महत्वाचे कारण आहे, फडणवीस यांनी गरिबांना मदत करून वर आणले आणि त्यामुळे हा विकास शक्य झाल्याचे" मोदी म्हणाले आहेत. तसेच येत्या काळात त्यांचे आरोग्य स्वस्थ राहावे अशी प्रार्थना करत फडणवीस यांच्याकडून अधिक कामाची अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली आहे. लंडन: जेव्हा क्रिकेट स्टेडियम मध्ये चाहते धरतात नरेंद्र मोदींचा बॅनर.. भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शेअर केला खास फोटो

नरेंद्र मोदी ट्विट

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सुट्टी न घेता आज महत्वपूर्ण बैठका घेऊन आपला खास दिवस साजरा करण्याचे योजले आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सेलिब्रेशन मध्ये वेळ न घालवता काम करणे हा त्यांचा बर्थडे प्लॅन असणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधून एक पत्रक जाहीर केले होते, ज्यामध्ये आपल्या वाढदिवशी हारतुरे, केक , बॅनरबाजी अशा गोष्टींमध्ये विनाकारण खर्च करण्यापेक्षा हेच पैसे तुम्ही मुख्यमंत्री सहायता निद्धीत भेट म्हणून द्यावे असे आवाहन करण्यात आले होते. यातून फडणवीस यांच्या सामाजिक बांधिलकीचा अंदाज तुम्हालाही आला असेल.