देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक सुरुच आहे. दिवसागणित कोरोना बाधितांचा आकडा वाढत असला तरी कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्याही चांगली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेटही सुधारत आहे. आजचा देशाचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 63.25 इतका असून मृत्यूदर (Fatality Rate) 2.57% इतका आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी दिली आहे. तसंच भारताची लोकसंख्या प्रचंड असली देशातील तरी कोविड-19 ची परिस्थिती इतर देशांच्या तुलनेत चांगली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मागील 24 तासांत भारतात 32,695 नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 9,68,876 वर पोहचला आहे. त्यापैकी 3,31,146 अॅक्टीव्ह केसेस असून 6,12,815 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. ही आकडेवारी पाहता कोरोनाच्या अॅक्टीव्ह केसेस पेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साधारण दुप्पट असल्याचे दिसून येते. दरम्यान देशात एकूण 24,915 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
ANI Tweet:
Despite being such a largely populated nation, we can perhaps claim to have performed better than any other country. Today our fatality rate is 2.57% and recovery rate is 63.25%: Union Health Minister Dr Harsh Vardhan. #COVID19 pic.twitter.com/wWMlcAYIID
— ANI (@ANI) July 16, 2020
देशातील कोरोनाची वाढती आकडेवारी चिंता वाढणारी असली तरी अद्याप कोरोना व्हायरसचा सामुदायिक संसर्ग (Community Transmission) झाला नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. तसंच महाराष्ट्रातही कम्युनिटी स्प्रेड नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे विशेष खबरदारी घेतल्यास कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळणे शक्य होईल.