प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus in India) अक्षरश: हाहाकार माजविला असून देशात सद्य घडीला कोरोना बाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. मागील 24 तासांत देशात 32,695 नव्या रुग्णांची नोंद झाली असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 9,68,876 वर पोहोचली आहे. तसेच मागील 24 तासांत 606 रुग्ण दगावले असून देशात मृतांचा आकडा 24,915 वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सद्य घडीला 3,31,146 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात 6,12,815 रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

भारतात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण हे महाराष्ट्रात (Maharashtra) आहेत. राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 2,75,640 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरात मध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. भारतात COVID19 च्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 63.24 टक्क्यांवर पोहचल्याची सरकारची माहिती

कोरोनाबाधित रुग्णांवर देशातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. तर आता भारतातील कोरोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट हा 63.24 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.