डेरा सच्चा सौदा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) याला एक महिन्यांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. गुरमीत राम रहीम याला बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला या प्रकरणात वीस वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सिरसा अश्रमातील दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्या प्रकरणीत गुरमीत राम रहिम याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणात शिक्षा ठोठावल्यानंतर त्याला 2017 पासून तो , हरियाणाच्या सुनारिया तुरुंगात आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये डेरा प्रमुखाला तीन आठवड्यांची फरलो मंजूर करण्यात आली होती.
पॅरोल म्हणजे काय?
पॅरोल म्हणजे एखाद्या कैद्याला तात्पुरते किंवा विशेष हेतूने सोडणे किंवा शिक्षा पूर्ण होण्याआधी, चांगल्या वर्तनाच्या आश्वासनावर तुरुंगातून अल्पकालीन अथवा इतर कारणासाठी तात्पुरती सुटका करणे. पॅरोल मंजूर झालेल्या कैद्याला कारागृहाने दिलेल्या मुदतीत पुन्हा कारागृहात यावे लागते. (हेही वाचा, Gurmeet Ram Rahim Furlough: बलात्कार प्रकरणातील दोषी गुरमीत राम रहीमला निवडणुकीपूर्वी मिळाली 21 दिवसांची रजा)
ट्विट
Dera Sacha Sauda chief Gurmeet Ram Rahim Singh granted one-month parole
Read @ANI Story |https://t.co/r24P2Mc794#RamRahimSingh #DeraSachaSaudaChief #Parole pic.twitter.com/pdGPhRHdBV
— ANI Digital (@ani_digital) June 17, 2022
ऑगस्ट 2017 मध्ये पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी गुरमीत राम रहिम याला न्यायालयाने दोषी ठरवले होते. तर, डेरा व्यवस्थापक रणजीत सिंगच्या हत्येप्रकरणी त्याला 8 ऑक्टोबर 2021 रोजी, न्यायालयाने रहीम आणि इतर चार जणांना दोषी ठरवले होते.