Weather Update: महाराष्ट्रात गारठा, दिल्ली धुक्यात गुडूप; 6 राज्यांमध्ये दोन दिवसांसाठी थंडीसाठी 'रेड अलर्ट'
Dense Fog and Cold | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Weather Forecast Nwes: भारतीय हवामान विभागाने (IMD Weather Update) गुरुवारी (25 जानेवारी) दिलेल्या माहितीनुसार, देशभरामध्ये तापमानाचा पारा घसरला आहे. कमी अधिक प्राणात थंडी सर्वत्र जाणवत आहे. उत्तर भारताकडील काही राज्यांमध्ये ती इतकी आहे की, सुरक्षेचा उपाय म्हणून आयएमडीने येत्या 28 ते 30 जानेवारीपर्यंत थंडीचा 'रेड अलर्ट' (Imd Red Alert For Cold) जारी केला आहे. या राज्यांमध्ये घनदाट धुके पसरले आहे. महाराष्ट्राचे हवामान, तापमान याबाबत सांगाचे तर गारठा वाढला असून, नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. दुसऱ्या बाजूला राजधानी दिल्ली हे धुक्याचे शहर बनले आहे. शहर धुक्यात गुडूप झाले आहे. शहरातील विविध भागांमध्ये दृश्यमानता कमी झाली आहे. काही प्रदेशामध्ये (Cold Wave) पाहायला मिळेल, असाही अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

थंडी, धुके आणि तीव्र गारव्याची स्थिती पुढचे किती काळ असेल असा प्रश्न नागरिक विचारत आहे. या प्रश्नाचे उत्तर आयएमडीने आगोदरच दिले असून पुढचे किमान दोन-ते तीन दिवस अशीच परिस्थिती कायम राहील असे म्हटले आहे. (हेही वाचा, IMD Weather Alert: देशात पुढील पाच दिवस तापमान आणखी घटन्याची शक्यता- हवामान विभाग)

कोणत्या ठिकाणी थंडीचा रेड अलर्ट?

पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान या सहा राज्यांमध्ये प्रामुख्याने हवामान विभगाने 'रेड अलर्ट' जारी केला आहे. हा अलर्ट 25 ते 30 जानेवारी या कालावधीसाठी असणार आहे. तसेच, या काळात कडाक्याच्या थंडीसोबतच, दाट धुक्यांची चादरही पाहायला मिळू शकते, असे म्हटले आहे. ज्यामुळे थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (हेही वाचा, Cold Wave: जीवघेण्या कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचे सोपे उपाय (पाहा व्हिडिओ))

उत्तरेकडील वातावरणात काही कमकूवत स्वरुपाच्या नैसर्गिक घडामोडींचा प्रभाव म्हणून 25 ते 30 जानेवारीपर्यंत पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलका पाऊस किंवा हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रिवादळास पोषक असलेली स्थिती निर्माण होत नसल्याने त्याचा परिणाम म्हणून विदर्भ, छत्तीसगड, तेलंगणा, किनारी आंध्रमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसांत प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतातही पाऊस आणि थंडीही पाहायला मिळू शकेल. दरम्यान, 25-28 जानेवारी दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे, असे आयएमडीने म्हटले आहे.

आयएमडीने वर्तवला थंडीचा अंदाज

आयएमडीने दिलेल्या माहितीनुस आज म्हणजेच 25 आणि 26 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये थंडी मोठ्या प्रमाणावर जाणवत राहिली. 27 आणि 28 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये थंडी कायम असेल. मध्य प्रदेश आणि पश्चिम राजस्थान आज (25 जानेवारी) आज थंडीने गारठलेला पाहायला मिळेल. आजपासून पुढचे तीन दिवस म्हणजे 26, 27, 28 बिहारच्या काही भागांमध्ये बोचरी थंडी पाहायला मिळू शकते.

थंडीच्या लाटेचा अंदाज

दरम्यान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये 25 आणि 26 जानेवारी रोजी थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. त्यासोबतच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 25 जानेवारीला काही ठिकाणी जमिनीवर दंव पडण्याची शक्यता आहे, असेही आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे.