
Denial of Sex: इंदौर पोलिसांनी एका 20 वर्षीय महिलेच्या भिन्नलिंगी लिव्ह इन पार्टनरला अटक केली आहे. त्याच्यावर पार्नरची हत्या केल्याचा आरोप आहे. प्राथमिक तपासात पुढे आले आहे की, लिव्ह इन रिलेशनमध्ये (Live-in Relationships) राहणाऱ्या महिला जोडिदाराने त्याला शारीरिक संबंधांसाठी नकार दिला. त्यामुले चिडलेल्या पार्टनरने तिची हत्या (Live-In Partner Kills For Denying Sex) केली. आरोपी आणि पीडित पाठिमागील काही दिवसांपासून शहरात भाड्याच्या घरात एकत्र राहात होते. दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवरुन भेटले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच दोघांची प्रथम भेट झाली होती, असे पोलिसांनी सांगितले.
भाड्याच्या घरात पीडितेचा मृतदेह
अतिरिक्त पोलीस उपायुक्त अभिनय विश्वकर्मा यांनी या प्रकरणाबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, इंदौर शहरातील रावजी बाजार परिसरात हे जोडपे भाड्याने घर घेऊन राहात होते. दरम्यान, सात डिसेंबर रोजी आरोपीने महिलेची हत्या केली. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना 9 डिसेंबर रोजी त्याच घरात पीडितेचा मृतदेह आढळून आला. प्रविण सिंह धाकड असे आरोपीचे नाव आहे. तो 24 वर्षांचा आहे. तो मुळचा गुना जिल्ह्यातील रहिवासी आहे. सोबतच्या पार्टनरने त्याला शरीरसंबंधांसाठी नकार दिल्याने तो चिडला आणि त्या रागाच्या भरात त्याने तिच्यावर कात्रीने वार केले. तिला भोसकले. मानेवर केलेला घाव वर्मी लागल्याने पीडितेचा मृत्यू झाला, असेही विश्वकर्मा यांनी सांगितले. (हेही वाचा, Live in Relationships are Time Pass: 'लिव्ह-इन रिलेशनशिप हे टाइमपास, तात्पुरते आणि नाजूक असतात'; Allahabad HC ने फेटाळली जोडप्याची संरक्षण मागणीची याचिका)
रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू
पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, प्रचंड प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने पीडितेचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंर आरोपी भानावर आला. त्याला काय करुन बसलो याची जाणीव झाल्याने तो तणावात आला. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह राहत्या खोलीतच बंद करुन ठेवला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपीने जाताना तिचा मोबाईलही सबत घेऊन गेला. हत्येचा प्रकार पुढे आल्यानंतर पोलिसांनी माग काढत आरोपीला अटक केली. (हेही वाचा, Live-in Relationships: लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये असलेल्या व्यक्तींना सामाजिक सुरक्षा आणि नोंदणी मिळावी, सुप्रिम कोर्टात याचिका दाखल)
लिव्ह-इन रिलेशन
लिव्ह-इन रिलेशन म्हणजेच सहवास ही अशी व्यवस्था आहे ज्याद्वारे दोन लोक भावनिक आणि/किंवा लैंगिकदृष्ट्या घनिष्ठ नातेसंबंधात दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. हा शब्द बहुधा विवाहित नसलेल्या जोडप्यांना लागू केला जातो. जे कोणत्याही प्रकारे अधिकृत विवाह न करता केवळ सोबत राहतात. ज्यांच्याकडे विवाह म्हणून कायदेशीर नोंद नसते मात्र त्यांचे परस्परांसोबतचे संबंध मात्र पती पत्नीसारखेच असतात. अलिकडील काही वर्षांमध्ये भारतात अशा प्रकारच्या संबंधांचे प्रमाण वाढले आहे. ही संकल्पना समाजात प्रचलीत असावी किंवा नसावी याबाबत संमिश्र भावना आहेत. याचे फायदे आणि तोटेही वेळोवेळी पाहायला मिळाले आहेत.